AUS vs AFG: अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय,असे असी आहे दोन्ही संघाची प्लेईंग 11

AUS vs AFG

AUS vs AFG: अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय,असे असी आहे दोन्ही संघाची प्लेईंग 11


AUS vs AFG: आयसीसी विश्वचषक २०२३ (World Cup 2023) चा ३९ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान  (Aus vs AFG) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियन संघाला हा सामना जिंकून उपांत्य फेरीतील आपला मार्ग सुकर करायचा आहे, तर अफगाण संघालाही हा सामना जिंकून उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहायचे आहे. शाहिदी आणि कंपनीने सामना जिंकल्यास ते बाद फेरी गाठण्याचे प्रबळ दावेदार मानले जातील.

विश्वचषकाच्या इतिहासात हे दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले आहेत आणि दोन्ही वेळा कांगारू संघाने मोठा विजय नोंदवला आहे. सध्या, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघ 7 पैकी 5 सामने जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर अफगाणिस्तानने देखील 7 सामने खेळले आहेत आणि 4 विजयांसह 6व्या स्थानावर आहे.

AUS vs AFG

अफगाणिस्तानची प्लेइंग इलेव्हन

रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम जद्रान, इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, नूर अहमद.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन

ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *