AUS vs NED: कांगारू खेळाडूंनी नेदरलँडच्या संघाला चिरडले: 48 वर्षानंतर मिळवला सर्वात मोठा विजय

आयसीसी वनडे विश्वचषक 2023मधील 24 व्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने नेदरलँड संघाचा 3009 धावांनी मोठा पराभव केला. कांगारू गोलंदाजाच्या पुढे नेदरलँड संघाच्या फलंदाजांनी गुडघे टेकत केवळ 21 षटकात 90 धावांवर सर्वबाद झाला. कांगारू संघाकडून ॲडम जॅम्पा याने आपल्या फिरकीची जादू दाखवत तीन शतकात आठ धावा देत चार गडी बाद केले.

या पराभवसह नेदरलँडच्या संघावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. चारशे धावांचा डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना संघातील कोणताच खेळाडू हा खेळपट्टीवर तग धरून राहू शकला नाही. त्यामुळे संपूर्ण संघ 90 धावांवर बाद झाला. विश्वचषक स्पर्धेतील नेदरलँड ची ही सर्वात कमी धावसंख्या आहे.

सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कांगारू संघाची सुरुवात खराब झाली मार्श हा स्वस्तात बाद झाला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मारनस लाबुशेन यांनी अर्धशतकी खेळी केली. ग्लेन मॅक्सवेल याने 44 चेंडूत 106 धावांची स्फोट खेळी केली तसेच डेव्हिड वॉर्नर याने 104 धावा काढल्या. पेट कमिन्स जोश हेजलवूड ॲडम जॅम्पा हे विकेट घेण्यात यशस्वी ठरले.

विश्वकप स्पर्धेतील नेदरलँडची ही सर्वात कमी धावसंख्या ठरली. विक्रमजीत याने नेदरलँड कडून सर्वाधिक पंचवीस धावा काढल्या. इतर फलंदाजाला दोन अंकी आकडा देखील काढता आला नाही.

ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने केवळ 44 चेंडूत 106 धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 8 उत्तुंग षटकार ठोकले. मॅक्सवेलने केवळ 84 धावा चौकार अन षटकार ठोकून काढले. त्याच्या या तुफानी शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 8 बाद 399 धावा काढल्या.

मॅक्सवेलने या खेळीसह विश्वचषकात सर्वात कमी चेंडूत शतक ठोकणारा ऍडम मारर्क्रमचा विक्रम देखील पाठीमागे टाकला.मारर्क्रमने याच विश्वचषक स्पर्धेत श्रीलंके विरुद्ध खेळताना केवळ 49 चेंडूत सेंचुरी पूर्ण केली होती. त्याआधी 2011 मध्ये आयर्लंडचा फलंदाज केविन ओ ब्रायन याने केवळ 50 चेंडूत शतक पूर्ण करून दाखवले होते. यापूर्वी मॅक्सवेलने 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत केवळ 51 चेंडूत शतक ठोकले होते.

ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स या जोडीने सातव्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी रचली. विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया कडून सातव्या विकेटसाठी रचलेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. यासह त्यांनी स्टीव्ह स्मिथ आणि नाथन कुलटर नाईन यांचा देखील विक्रम मोडीत काढला. या दोघांनी 2019 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत विंडीज विरुद्ध खेळताना सातव्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी रचली होती.