AUS vs NZ: विश्रांतीनंतर ऑस्ट्रोलीयाचे दिग्गज खेळाडू संघात परतले, या कारणामुळे संघात असूनही पॅट कमिन्स सांभाळणार नाही कर्णधारपद..

AUS vs NZ: विश्रांतीनंतर ऑस्ट्रोलीयाचे दिग्गज खेळाडू संघात परतले, या कारणामुळे संघात असूनही पॅट कमिन्स सांभाळणार नाही कर्णधारपद..

AUS vs NZ:  वेस्ट इंडिजसोबतच्या मायदेशातील मालिकेदरम्यान न्यूझीलंड दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानेही टी-20 संघाची घोषणा केली आहे. न्यूझीलंड संघाची खास बाब म्हणजे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर ठेवण्यात आलेली मोठी नावे संघात परतली आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी पॅट कमिन्सचे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, तो संघाचा कर्णधार असणार नाही. कर्णधारपदाची धुरा मिचेल मार्शच्या हाती राहील. 9 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतही मार्शकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली आहे.

ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंड दौरा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या दौऱ्यात 21, 23 आणि 25 फेब्रुवारीला एकूण 3 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना वेलिंग्टन येथे होणार आहे. तर शेवटचे 2 टी-20 सामने ऑकलंडमध्ये खेळवले जातील. मात्र, या दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला वेस्ट इंडिजसोबत मायदेशात टी-20 मालिका खेळायची आहे.

AUS vs NZ: विश्रांतीनंतर ऑस्ट्रोलीयाचे दिग्गज खेळाडू संघात परतले, या कारणामुळे संघात असूनही पॅट कमिन्स सांभाळणार नाही कर्णधारपद..

AUS vs NZ:  विश्रांतीनंतर हे ऑस्ट्रेलियन खेळाडू टी-20 संघात परतले.

पॅट कमिन्सशिवाय डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनेही न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडलेल्या ऑस्ट्रेलियाच्या T20 संघात पुनरागमन केले आहे. या दोन्ही अनुभवी खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय स्टीव्ह स्मिथलाही संघात स्थान मिळाले आहे. स्मिथही वेस्ट इंडिजसोबतच्या घरच्या टी-२० मालिकेतून ब्रेकवर होता.

AUS vs NZ:  न्यूझीलंड दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचे समीकरण.

पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांच्याशिवाय नॅथन एलिस आणि हेझलवूड हे संघाचे अन्य वेगवान गोलंदाज असतील. डेव्हिड वॉर्नर संघाच्या सलामीच्या जोडीचे नेतृत्व करताना दिसणार आहे, जिथे मॅथ्यू शॉर्ट त्याचा जोडीदार असू शकतो. खुद्द कर्णधार मिचेल मार्शशिवाय ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिससारखी मोठी नावे संघात अष्टपैलूच्या भूमिकेत आहेत. न्यूझीलंड दौऱ्यासाठी दोन यष्टिरक्षकांची निवड करण्यात आली असून त्यापैकी एक मॅथ्यू वेड आणि दुसरा जोस इंग्लिस आहे. ॲडम झाम्पा संघाच्या फिरकी विभागाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

AUS vs NZ: विश्रांतीनंतर ऑस्ट्रोलीयाचे दिग्गज खेळाडू संघात परतले, या कारणामुळे संघात असूनही पॅट कमिन्स सांभाळणार नाही कर्णधारपद..

न्यूझीलंड दौऱ्यावर मिचेल मार्शला कर्णधारपद मिळाल्याने तो टी-२० विश्वचषकाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचेही सूचित करते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मार्शने प्रथमच संघाची कमान सांभाळली.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा T20 संघ

मिचेल मार्श (कर्णधार), पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर. ग्लेन मॅक्सवेल, जोस इंग्लिस, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, जोश हेझलवूड, नॅथन एलिस, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड, ॲडम झाम्पा, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

IND vs ENG: कर्णधार रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर.. धोनी- सेहवागचा मोठा विक्रम होणार ध्वस्त?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *