AUS vs SA LIVE UPDATES: पाच वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना आज विश्वचषक 2023 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत सुरू आहे. उभय संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत एकूण 109 सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाला 50 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. तर आफ्रिकन संघाने 55 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला आहे, तर तीन सामने टाय झाले आहेत.
AUS vs SA LIVE UPDATES: Rassie Van der Dussen देखील बाद.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अनेकदा चोकर म्हटले जात होते आणि तेच पुन्हा एकदा होऊ लागले आहे. संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 24 धावांवर 4 विकेट्स गमावल्या. रॅसी व्हॅन डर डुसेनला जोश हेझलवूडने त्याचा दुसरा बळी बनवले.
AUS vs SA LIVE UPDATES: Aiden Markram परतला माघारी.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खूपच खराब झाली होती. मिचेल स्टार्कने दुसरी विकेट घेत संघाला तिसरे यश मिळवून दिले.
AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेला दुसरा मोठा धक्का बसला, क्विंटन डी कॉक अवघ्या 3 धावा करून बाद झाला. जोश हेझलवूडने ऑस्ट्रेलियाला दुसरे यश मिळवून दिले.
AUS vs SA LIVE UPDATES: नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, आणि कर्णधार टेम्बा बावुमा झाला शून्यावर बाद..
नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामागे सरळ कारण होते की मागच्या अनेक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू प्रथम फलंदाजी करतांना अतिशय स्फोटक खेळी खेळून संघाला 350/400 धावा सहज करून सामन्यात एकहाती वर न्यायचे. मात्र हा सामन्यात स्वतः कर्णधार टेम्बा बावुमा सरुवातिलाच शून्यावर बाद झाला..
(ही ऑस्ट्रोलीया आणि दक्षिण आफ्रिका ( AUS vs SA) सामन्याची लाइव्ह अपडेट्स Wall आहे. सामन्याची प्रत्येक मिनिटाचे अपडेट्स तुम्ही या ठिकाणी वाचू शकता)
हेही वाचा:
- ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.
- .शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..
- टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..