AUS vs SA: विश्वचषक 2023 चा दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA)यांच्यात ईडन गार्डन, कोलकाता येथे खेळला जात आहे. हा सामना खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे ज्यात दोन्ही संघ अंतिम फेरीचे तिकीट मिळविण्यासाठी एकमेकांना कडवी टक्कर देताना दिसतील. विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली आहे.
दोघांनी 9 पैकी 7 सामने जिंकले आहेत. चांगल्या धावगतीमुळे आफ्रिका दुसऱ्या स्थानावर तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. आफ्रिकेने साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे, त्यामुळे या सामन्यात त्यांचा आत्मविश्वास खूप उंचावला आहे, पण या सामन्यात ऑस्ट्रेलियाही पलटवार करण्यास सज्ज आहे.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि दक्षिण आफ्रिकेचा टेम्बा बावुमा कोलकाता येथील ईडन गार्डन येथे नाणेफेकसाठी पोहोचले. नाणे दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने पडले आणि त्यानंतर टेम्बा बावुमाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकन कर्णधाराने हा निर्णय थेट त्याच्या संघाची ताकद लक्षात घेऊन घेतला आहे. कारण प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेने गेल्या 7 सामन्यांमध्ये 300 पेक्षा जास्त धावांचा टप्पा ओलांडला आहे.
पाठलाग करताना या संघाला 2 सामन्यात पराभव पत्करावा लागला. प्लेइंग इलेव्हनबद्दल सांगायचे तर, टेम्बा बावुमाने लुंगी एनगिडीला वगळून तबरेझ शम्सीचा समावेश केला आहे. दुसरीकडे, पॅटने ऑस्ट्रेलियाच्या मुख्य अकरामध्ये मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा पुन्हा समावेश केला आहे.
AUS vs SA: असी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन :पॅट कमिन्स (कर्णधार), जोश इंग्लिस, डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, हेनरिक क्लासेन, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.
AUS vs SA: हेड टू हेड
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 109 सामने खेळले गेले आहेत ज्यात दक्षिण आफ्रिकेने 55 सामने जिंकले आहेत तर ऑस्ट्रेलियाने 50 सामने जिंकले आहेत. 1 सामन्याचा निकाल लागला नाही तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. या आकडेवारीनुसार दक्षिण आफ्रिकेचा वरचष्मा आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही संघ आतापर्यंत 7 वेळा आमनेसामने आले आहेत आणि दोघांनी प्रत्येकी 3 सामने जिंकले आहेत आणि 1 सामना अनिर्णित राहिला आहे.
हेही वाचा:
- ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.
- .शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..
- टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..