AUS vs SL: पहिल्या दोन पराभवानंतर श्रीलंकेला हरवून ऑस्ट्रेलियाने (AUS vs SL) अखेर विजयाचे खाते उघडले. आयसीसी विश्वचषक 2023च्या चौदाव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह कांगारू संघाने दोन गुणांची कमाई देखील केली. तसेच या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. विश्वचषकात एका संघविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाने केला आहे. आतापर्यंत असा विक्रम कोणत्याही संघाला करता आला नाही.
ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध खेळताना एकूण 9 विजय मिळवले आहेत. एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ आहे. त्यानंतर भारतीय संघाने सर्वाधिक आठ सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे. तसेच पाकिस्तानने देखील श्रीलंकाविरुद्ध खेळताना विश्वचषकात सलग आठ सामन्यात विजय मिळवला आहे. 1996 साली भारतात झालेल्या विश्वकपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विश्वचषकावर कब्जा मिळवला होता. त्यानंतर श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकात एकदाही विजय मिळवता आला नाही.
AUS vs SL: ऑस्ट्रोलीयाची दमदार कामगिरी
नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना सलामीच्या खेळाडूंनी श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. पाथूम निशंका आणि कुशल परेरा यांनी 125 धावांची भागीदारी केली. निशंका ने 61 धावा तर परेराने 78 धावा काढल्या. हे दोघे बाद होता श्रीलंकेचा डाव पत्त्यासारखे कोसळला. इतर कोणत्याही खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही. श्रीलंकेने दमदार सुरुवात केल्यानंतर संघ 400 च्या पुढे धावा काढेल असे वाटले होते, मात्र ऑस्ट्रेलियाच्या भेदक मारा पुढे श्रीलंकेचा डाव कोसळून गेला. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क आणि कमिन्सेने प्रत्येकी दोन गडी बाद केले तर ॲडम जाम्पा याने 47 धावा देत चार गडी बाद केले.
श्रीलंकेने दिलेले 210 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कांगारूची सुरुवात ही अत्यंत खराब झाली. डेव्हिड वॉर्नर 11धावांवर मधुशंकाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेला स्टीव्ह स्मिथ हा भोपळा देखील फोडू शकला नाही. तो शून्य धावसंख्या वर बाद होत आला तसा परत गेला.
त्यानंतर आलेला मिचेल मार्श आणि मारर्न्स लाभूशेन यांनी अर्धशतकी भागीदारी केली मार्शने 52 तर लाबुशेन 40 धावांचे योगदान दिले. मार्शबाद होताच जोश इंग्लिश याने धमाकेदार खेळीचे प्रदर्शन केले. त्याने 59 चेंडूत 58 धावांची खेळी केली. लाबुशेन सोबत त्याने चौथ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी रचली. जोश इंग्लिश याने त्याच्या या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार ठोकले. मार्क स्टोइनिस हा 20 धावांवर नाबाद राहिला.
- हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी