विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकून ऑस्ट्रेलिया बनला टॉपचा संघ ! पहा भारताची आकडेवारी काय आहे

2023 विश्वचषक स्पर्धेतला प्रबळ दावेदार म्हणल्या जाणाऱ्या भारतीय संघाने यंदाच्या स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे. भारतीय संघाने सलग सहा सामने जिंकत गुणतलिकेत टॉपवर पोहोचले आहे. भारतीय संघाची विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक सामने जिंकण्याची आकडेवारी पाहिली असता संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत भारताने विश्वचषक स्पर्धेत 59 सामने जिंकले आहेत. कोणत्या संघाने विश्वचषक स्पर्धेत किती सामने जिंकले आहेत याची आकडेवारी पाहूयात.

पाच वेळा विश्व चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी केले आहे. कांगारू संघाने विश्वचषक स्पर्धेत एकूण 73 सामन्यात सर्वाधिक विजय मिळवला आहे. यंदाच्या स्पर्धेत संघाने दोन सामने गमावल्यानंतर पुन्हा हा संघ विजयाच्या रुळावर परतला आहे. पॅटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला देखील विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघाच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या स्थानावर आहे.

न्यूझीलंड क्रिकेट संघाची विजयाची आकडेवारी पाहिली असता जेम-तेम आहे. न्यूझीलंडने विश्वचषक स्पर्धेतील 58 सामन्यात विजय मिळवला आहे. या संघाला एकदाही विश्वचषक जिंकता आला नाही.

2019 मध्ये चॅम्पियन ठरलेल्या इंग्लंडच्या संघाने विश्वचषक स्पर्धेचे आकडेवारी ही समाधानकारक आहे. विश्वचषक स्पर्धेत या संघाने आतापर्यंत 49 सामन्यात विजय मिळवला आहे.

1992 मध्ये पहिल्यांदा विश्वचषक चषकावर नाव कोरणाऱ्या पाकिस्तान संघाची कामगिरी देखील समाधानकारक आहे. हा संघ या यादीत पाचव्या स्थानावर आहे. पाकने विश्वचषक स्पर्धेत 47 सामन्यात विजयाची नोंद केली आहे.

‘चोकर्स’चा टॅग लागलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने विश्वचषक स्पर्धेत 43 सामन्यात विजयाची नोंद केली आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी भरलेल्या या संघाला एकदाही विश्वचषक जिंकता आला नाही.

विश्वचषक स्पर्धेत दोनदा चॅम्पियन ठरलेल्या वेस्टइंडीज संघाची कामगिरी दमदार आहे. यांनी जवळपास 43 सामन्यात विजय मिळवला आहे.

1996 मध्ये कर्णधार अर्जुन रणतुंगा याच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या श्रीलंका संघाने विश्वचषकातील 40 सामन्यात विजय मिळवल्याची नोंद आहे.

मोठ-मोठ्या मातब्बर संघांना हरवून उलटफेर घडवून आणणाऱ्या बांगलादेश संघाची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. केवळ पंधरा सामन्यात त्यांना विजय नोंदवता आला आहे.

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघाच्या यादीमध्ये झिम्बाब्वे चा संघ दहाव्या स्थानावर आहे. या संघाला केवळ 11 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. तसेच यंदाच्या स्पर्धेत देखील हा संघपात्र ठरू शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *