ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद..! अशी कामगिरी करणारा ठरला विश्वचषकातील सर्वांत पहिला संघ.
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दक्षिण आफ्रिके विरुद्ध लखनऊ येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम वर सामना खेळत आहे. विश्वचषकाच्या या दहाव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डिकॉकच्या शतकी खेळाच्या जोरावर 7 बाद 311 धावा केल्या आहेत. याच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर दुसऱ्यांदा झाला आहे. एकाच सामन्यात सर्वाधिक झेल सोडण्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघ आघाडीवर आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी एकूण सहा झेल सोडले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने काही सोपे तर काही अवघड असणारे झेल सहजच सोडले. पाच वेळा विश्वचषकावर नाव करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाच्या या सुमार क्षेत्ररक्षणावर सध्या टीकास्त्र सुरु आहे. मागील वर्षी इंग्लंड विरुद्ध एडिलेड येथे झालेल्या सामन्यात एकूण सहा झेल सोडले होते. ऑस्ट्रेलिया हा कारनामा पुन्हा आजच्या सामन्यात केला.
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात देखील विराट कोहलीचा सोपा झेल सोडला. त्यावेळी तीन बाद दोन अशी भारताची धावसंख्या होती. मिचेल मार्शने हा सोपा झेल सोडला. हा झेल सोडणे ऑस्ट्रेलिया चांगलेच महागात पडले. या सामन्यात विराटने या सामन्यात अर्धशतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. विराटचा हा झेल सोडला नसता तर, या सामन्याचा निकाल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला असता.
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या प्रचंड दडपणाखाली खेळत आहे. भारताविरुद्धच्या झालेल्या सामन्यात झालेला पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. ऑस्ट्रेलिया संघातील सर्वच खेळाडू हे उत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये गणले जातात. अत्यंत चपळ असलेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अनेकदा हवेत सूर मारून झेल पकडताना आपल्याला दिसून आले.
ऑस्ट्रोलीया विरुद्ध दक्षिण आफ्रिका ,स्कोरकार्ड.
सामन्या बाबतीत बोलायचे झाले तर, दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा या सामन्यात 134 धावानी दणदणीत पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा पराभव ठरला. सुमार दर्जाच्या क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. विश्वचषकाच्या आतापर्यंतच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने कधीही पहिला आणि दुसरा सामना गमावला नाही. 2003 आणि 2007 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावला नव्हता. ऑस्ट्रेलियाचा आता पुढचा सामना शनिवारी 14 ऑक्टोंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध लखनऊच्या याच मैदानावर होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ दरवर्षी प्रत्येक विश्वचषकात एका चॅम्पियन संघाप्रमाणे खेळत असतो. यंदाच्या विश्वचषकात हा संघ लईत असलेला दिसून येत नाही. ऑस्ट्रेलियाला यापुढे इंग्लंड, न्यूझीलंड या संघाबरोबर दोन हात करायचे आहेत. सध्या तरी ऑस्ट्रेलिया संघाचा पुढचा पेपर अवघड असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा:
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..