Cricket Newsआयपीएल 2024क्रीडा

MS Dhoni Ipl Career: धोनी आयपीएलमध्ये चमकत आहे, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (CSK vs RCB)  यांच्यात पहिला सामना झाला. पहिल्या सामन्यात चेन्नईने बंगळुरूचा पराभव करत विजय सलामी दिली. चेन्नई सुपर किंग्सने यंदा नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला. महेंद्रसिंग धोनीने सीएसके कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर ऋतुराज गायकवाडकडे ही जबाबदारी देण्यात आली. धोनी कर्णधार नसला तरी, फलंदाजीत त्याचा जलवा कायम आहे. कालच्या सामन्यात त्याने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.

धोनी जैसा कोई नही...! आयपीएल मधील आकडेवारी दमदार; वाचा त्याच्या कारकीर्दीचा आलेख.

आयपीएलच्या इतिहासामध्ये विसाव्या षटकात सर्वाधिक धावा काढण्यात आणि सर्वाधिक चौकार षटकार ठोकण्यामध्ये महेंद्रसिंग धोनी पहिल्या स्थानावर आहे. तर एकाच षटकात सर्वाधिक धावा काढण्यामध्ये रवींद्र जडेजा हा पहिल्या स्थानावर आहे.

आयपीएलमध्ये 20व्या षटकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • फलंदाज धावा स्ट्राईक रेट

  • एमएस धोनी 715 241

  • किरॉन पोलार्ड 405 214

  • रवींद्र जडेजा 353 210

  • हार्दिक पंड्या 277 243

  • दिनेश कार्तिक 253 209

महेंद्रसिंग धोनीने त्याच्या आयपीएल कारकिर्दीमध्ये विसाव्या शतकात 715 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 231 आहे. यासह त्याने शेवटच्या षटकात 108 चौकार मारले आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर कायरन पोलार्ड आहे. मुबईच्या या अष्टपैलू खेळाडूंनी 20व्या षटकात 405 धावा केल्या आहेत. 214 हा त्याचा स्ट्राइकट असून त्याने 59 चौकार मारले होते. 20 व्या षटकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 210 च्या स्ट्राईकरेटने 335 धावा केल्या आहेत. यात 46 चौकारांचा समावेश आहे. हार्दिक पांड्याने देखील 277 धावा केल्या होत्या. यात 37 चौकारांचा समावेश आहे तर दिनेश कार्तिकने 253 धावा केल्या आहेत.

MS Dhoni Ipl Career: धोनी आयपीएलमध्ये चमकत आहे, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

आयपीएल मध्ये सर्वाधिक चौकार मारणारे खेळाडू

  • एमएस धोनी 108

  • कीरोन पोलार्ड 59

  • रवींद्र जडेजा 46

  • हार्दिक पांड्या 44

  • रोहित शर्मा 37

  • एबी डिविलियर्स 33


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button