ऑस्ट्रोलीया क्रिकेटसंघाला मोठा धक्का, या माजी दिग्गज खेळाडूचे झाले निधन… अचानक चक्कर येऊन खाली कोसळला होता.
ऑस्ट्रोलीया क्रिकेटसंघाला मोठा धक्का, या माजी दिग्गज खेळाडूचे झाले निधन… अचानक चक्कर येऊन खाली कोसळला होता.
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ॲलन थॉमसन यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. थॉमसनने वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिली विकेट घेतली. रिपोर्ट्सनुसार, थॉमसन काही दिवसांपूर्वीच कोसळला होता, त्यानंतर त्याच्यावर हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रियाही झाली होती.
ॲलन त्याच्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. 1970-71 मध्ये खेळल्या गेलेल्या सात कसोटींच्या ऍशेज मालिकेत त्याने ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले. तो ब्रिस्बेन आणि पर्थ येथे पहिल्या दोन कसोटीत खेळला, पण मेलबर्नमधील नवीन वर्षाच्या कसोटीसाठी त्याची निवड झाली नाही.
मात्र एकही चेंडू न टाकता पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. मालिकेतील पाचवा आणि सहावा कसोटी सामना खेळला. त्याआधी त्याने इतिहास रचला.

थॉमसनने या सामन्यात पहिली विकेट घेतली, त्याने स्क्वेअर लेगवर बिल लॉरीकरवी ज्योफ बॉयकॉटला झेलबाद केले. या सामन्यात ऍलनने आठ षटकांत 22 धावा देत एक बळी घेतला. मात्र, त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय सामने खेळला नाही.
थॉमसनने ऑस्ट्रेलियासाठी एकूण 4 कसोटी सामने खेळले आणि 12 बळी घेतले. प्रथम श्रेणीमध्ये त्याने 44 सामने खेळले आणि त्याच्या खात्यात 184 बळी घेतले.
हेही वाचा:
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..