Author: admin

IND vs AUS 3rd Test: सध्या, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दोन्ही 1-1 ने बरोबरीत आहेत. पहिला सामना टीम इंडियाने तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. दुसरी कसोटी गुलाबी चेंडूने (Pink Ball Test) खेळली गेली, ज्यात ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने विजय मिळवला. आता तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज स्टीव्ह स्मिथ सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे, स्मिथच्या खराब फॉर्ममुळे ऑस्ट्रेलियन संघाचा तणाव वाढला आहे. त्यामुळे स्मिथला गाबा कसोटीतून बाहेर ठेवले जाऊ शकते.. IND vs AUS 3rd Test: स्मिथ खराब फॉर्मशी झुंजत आहे! स्टीव्ह स्मिथसाठी 2024 हे वर्ष खूप वाईट गेले.…

Read More

U-19 Asia Cup 2024: दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंडर-19 आशिया चषक 2024 च्या अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताला पराभूत करत मोठा पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या विजयासह बांगलादेशने आपल्या विजेतेपदाचा यशस्वी बचाव केला. अंतिम सामना कमी स्कोअरिंगचा होता, परंतु बांगलादेश संघाने चमकदार कामगिरी करत विजय मिळवला. U-19 Asia Cup 2024: बांग्लादेश ठरला सलग 2वेळा विश्वचषक जिंकणारा दुसरा संघ..! बांगलादेश संघाने सलग दुसऱ्यांदा अंडर-19 आशिया चषकाचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला. ही स्पर्धा 1989 मध्ये सुरू झाली आणि बांगलादेश आता या स्पर्धेचे विजेतेपद दोनदा जिंकणारा दुसरा संघ बनला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 8 वेळा या स्पर्धेची ट्रॉफी जिंकली…

Read More

मोहम्मद सिराज:  भारत आणि ऑस्ट्रोलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसरा कसोटी सामना चांगलाच गाजला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रोलियाने तब्बल 10 विकेट्सने टीम इंडियाचा पराभव केला. या सामन्यादरम्यानदुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडला 140 धावांवर क्लीन बोल्ड केले, त्यानंतर मैदानावरील वातावरण चांगले तापले होत. विकेट घेतल्यानंतर सिराजने आक्रमक पद्धतीने हेडला निरोप दिला आणि पॅव्हेलियनमध्ये परतण्याचे संकेत दिले.ज्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर आता दोन्ही खेळाडूंनी  आपापली प्रतिक्रिया दिली आहे. याआधी ट्रॅव्हिस हेडने या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली होती, मात्र आता मोहम्मद सिराजनेही आपली बाजू मांडत हेडला खोटारडे म्हटले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ट्रॅव्हिस हेड…

Read More

Babar Aazam Net Worth:  पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आजम (Babar Azam) आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. लहान वयात बाबरने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत जे भविष्यात कोणत्याही फलंदाजाला तोडणे सोपे जाणार नाही. बाबरची तुलना भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीशी केली जाते. विराटप्रमाणेच बाबरही तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करतो. मात्र, विराटने बाबरपेक्षा जास्त सामने खेळून संघाला विजयापर्यंत नेले आहे. बाबर आजम (Babar Azam) ने पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या नावावर मोठी कामगिरी नोंदवली होती. तेव्हापासूनच त्याची विराट कोहलीशी तुलना सुरु झाली होती. बाबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 13 हजार धावा करणारा पाकिस्तानी फलंदाज ठरला आहे.…

Read More

ENG vs NZ: इंग्लंड हा क्रिकेटचा जन्मदाता देश म्हणून ओळखला जातो. क्रिकेटला जेन्टलमन खेळ म्हणून ओळखल जाते ते इंग्लंडमुळेच आणि याच इग्लंड संघाने आज क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत मोठा टप्पा  पार करत एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे. सध्या सुरु असलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड ( ENG vs NZ) यांच्यातील कसोटी सामन्यात हा विक्रम झाला आहे. तुम्हाला माहीत आहे का कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा (Most Runs  in test Cricket) संघ कोण आहे? अलीकडेच, इंग्लंडने क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम केला की, आजपर्यंत इतर कोणताही संघ करू शकला नाही. कसोटी सामन्यात विक्रमी धावसंख्या करत इंग्लंडने नवा इतिहास रचला आहे. हे यश संघाच्या…

Read More

ICC Champion trophy 2025:  आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. स्पर्धेचे वेळापत्रक ठरवण्यासाठी होणारी बैठक आता 7 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) हायब्रिड मॉडेलला सहमती दर्शवल्याची बातमी आहे. अशा स्थितीत भारतीय संघाचे सामने आता पाकिस्तानऐवजी अन्य कोणत्या तरी देशात खेळवले जातील. ICC Champion trophy 2025: 15 पैकी 5 सामने पाकिस्तानच्या बाहेर होतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसीने फायनलसह भारतीय संघाचे सर्व सामने यूएईमध्ये आयोजित करण्याची योजना आखली आहे. आयसीसीच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “सर्व पक्षांनी 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान आणि UAE मध्ये होणार यावर सहमती दर्शवली आहे. भारत आपले सर्व सामने दुबईत…

Read More