असे झाले असते तर बाबर आजम देखील विराट कोहली बरोबर भारतीय संघात खेळला असता…!

असे झाले असते तर बाबर आजम देखील विराट कोहली बरोबर भारतीय संघात खेळला असता...!

असे झाले असते तर बाबर आजम देखील विराट कोहली बरोबर भारतीय संघात खेळला असता…!


भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी  स्टेडियमवर सामना रंगणार आहे. या सामन्यात भारतीय खेळाडूंबरोबर पाकिस्तानच्या खेळाडूंवर साऱ्या क्रिकेट प्रेमींच्या नजरा असतील. बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ इतिहास घडवण्यासाठी आज मैदानात उतरेल. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम हा सध्याच्या घडीला सर्वोत्तम फलंदाज आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत देखील तो सध्या टॉपवर आहे. आजच्या सामन्यात तो कशी कामगिरी करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

बाबर आजम चे आहे भारताशी खास कनेक्शन.

28 वर्षीय ‘बाबर आजम’ हा आज पाकिस्तान संघाकडून खेळत असला तरी त्याचं भारताशी खास नातं आहे. बाबर आजमचा मूळ परिवार हा भारतातला आहे. कालांतराने ते पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झाले. 1968 साली पंजाबच्या होशियारपुरचे रहिवासी असलेले आजम परिवार पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झाले. त्यावेळी बाबरचा जन्म झाला नव्हता. आजमचा परिवार भारतात राहिला असता तर बाबरचा जन्म हा भारतात झाला असता. आणि तो विराट कोहली सोबत भारतीय संघात खेळताना देखील दिसला असता.

असे झाले असते तर बाबर आजम देखील विराट कोहली बरोबर भारतीय संघात खेळला असता...!

आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जाणाऱ्या या स्टायलिश फलंदाजाची तुलना नेहमी विराट कोहली बरोबर केली जाते. पाकिस्तानचे क्रिकेट चाहते, समालोचक आणि माजी खेळाडू हे नेहमी विराट कोहली पेक्षा बाबर आजम कसा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे, याची चर्चा करतात. असे असले तरी धावांच्या बाबतीमध्ये विराट कोहली बाबरपेक्षा कितीतरी धावांनी पुढे आहे.

आज त्याच्याच नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ भारतात विश्वचषक खेळण्यासाठी आला आहे. पाकिस्तानने आतापर्यंत भारताला विश्वचषकात एकदाही हरवला नाही. आज बाबरच्या मदतीला शाहीनशहा आफ्रिदी, हसन अली, राउफ यासारखे जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत.

असे झाले असते तर बाबर आजम देखील विराट कोहली बरोबर भारतीय संघात खेळला असता...!

कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल आपल्या बाजूने झुकवू शकणारा तडाखेबाज खेळाडू’मोहम्मद रिजवान’ पाकिस्तान संघात फुल फार्मात आहे. रिजवानी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मागील सामन्यात दमदार शतक ठोकून पाकिस्तानला सर्वात मोठा विजय मिळवून दिला होता. भारताविरुद्ध आजच्या सामन्यात त्याच्याकडून पाकिस्तानला अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. एकंदरीतच बाबरचा संघ देखील सध्या फार्मात आहे. हा अत्यंत चुरशीचा सामना क्रिकेट प्रेमीना पाहता येणार आहे.

बाबर आजम अंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर

बाबर आजम आतापर्यंत 110 एकदिवसीय सामने खेळला आहे. त्याने 88.89 च्या सरासरीने 5,424 धावा केल्या आहेत. यात 19 दमदार शतक आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच 49 कसोटी सामन्यात 55.19 च्या सरासरीने 3,372 धावा कुठल्या आहेत. यात 9 शतके आणि 26 अर्धशतके ठोकली आहेत. T20 क्रिकेटमध्ये देखील त्याची आकडेवारी लक्षवेधक आहे.


हेही वाचा:

विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.

अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत