Babar Azam Stepdown: मोठी बातमी.. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सर्व फोर्मेटच्या कर्णधार पदाचा दिला राजीनामा, समोर आले धक्कादायक कारण..

Babar Azam Stepdown:  2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील या संघातील कोणत्याही खेळाडूने चांगली कामगिरी केली नाही, ज्यामुळे संघ उपांत्य फेरीपूर्वीच बाहेर पडला. पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीनंतर कॅप्टन बाबा आझम यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे.

त्याच्या कर्णधारपदावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, आता पाकिस्तानात पोहोचल्यानंतर बाबरने मोठा निर्णय घेतला आहे. अखेर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या जागी हे दोन दिग्गज खेळाडू पाकिस्तानचे कर्णधारपद स्वीकारू शकतात.

Babar Azam Stepdown: बाबर आझमचा मोठा निर्णय

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. शाहिद आफ्रिदी, अब्दुल रज्जाक यांच्याशिवाय वसीम अक्रमसारखे दिग्गज खेळाडूही बाबर आझमच्या कर्णधारपदावर टीका करत होते. मात्र, एवढ्या टीकेनंतर बाबरने आता पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदाचा निरोप घेतला आहे.

Babar Azam Stepdown:  बाबरच्या राजीनाम्यानंतर हे दोन खेळाडू  होऊ शकतात कर्णधार..

Babar Azam Stepdown: मोठी बातमी.. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सर्व फोर्मेटच्या कर्णधार पदाचा दिला राजीनामा, समोर आले धक्कादायक कारण..

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्णधार बाबर आझम पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीच्या कार्यालयात पोहोचले होते, जिथे चर्चेनंतर त्यानी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. मात्र बाबर आझम व्यतिरिक्त पाकिस्तानचे माजी कर्णधार सरफराज अहमद आणि शान मसूद हे देखील या बैठकीचा भाग असल्याची बातमी आहे. आता सर्फराज अहमद किंवा युवा खेळाडू शान मसूदला पाकिस्तानचा पुढचा कर्णधार बनवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

World Cup 2023 मध्ये पाकिस्तानची सुमार कामगिरी..

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आले नव्हते. २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, इंग्लंडच्या हातून त्यांची निराशा झाली. याशिवाय 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतही संघाची खराब कामगिरी दिसून आली. संघाने लीगमध्ये 9 सामने खेळले, ज्यामध्ये त्यांना चार विजय आणि पाच पराभवांचा सामना करावा लागला. यासह त्यांचा प्रवास लीग सामन्यातच संपला. तेव्हापासून बाबर वर कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव वाढत होता. अखेर बाबर ने आज पीसीबी अध्यक्षाकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.


  • हेही वाचा:

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *