हे आहेत क्रिकेटमधील सर्वांत मोठे ‘बॅड बॉय’ क्रिकेटर, एकापेक्षा अनेक मुलींसोबत केलेत अफेअर…

हे आहेत क्रिकेटमधील सर्वांत मोठे 'बॅड बॉय' क्रिकेटर, एकापेक्षा अनेक मुलींसोबत केलेत अफेअर...

क्रिकेट जगताच्या इतिहासात असे अनेक स्टार खेळाडू घडले आहेत ज्यांनी आपल्या खेळातील जबरदस्त कामगिरीच्या जोरावर संपूर्ण जगात स्वत:चे खास नाव कमावले आहे. तर दुसरीकडे असे काही क्रिकेटपटू आहेत जे त्यांच्या फलंदाजी किंवा गोलंदाजीच्या कामगिरीव्यतिरिक्त इतर कारणांमुळे लोकांमध्ये चर्चेचा विषय बनले आणि त्यांनी स्वतःला क्रिकेट जगताचा बॅड बॉय बनवले.

आज आम्ही तुम्हाला अशा निवडक क्रिकेटपटूंबद्दल सांगणार  आहोत, जे क्रिकेट व्यतिरिक्त, त्यांच्या ड्रग्जच्या व्यसनासाठी, अफेअरसाठी प्रसिद्ध होते . चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू.

हे आहेत आंतरराष्ट्रीय क्रीकेटमधील सर्वांत मोठे ‘बॅड बॉय’ खेळाडू.

शेन वॉर्न.

या यादीत पहिले नाव आहे ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नचे. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याच्या गोलंदाजीच्या कामगिरीपेक्षा जास्त प्रसिद्धी मैदानाबाहेर त्याच्या गैरकृत्यांमुळे मिळवली. ड्रग्जच्या आहारी गेलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नवर ड्रग्ज घेतल्यामुळे 2003 वर्ल्ड कपपूर्वी बंदी घालण्यात आली होती. यानंतरही तो आपले अंमली पदार्थांचे व्यसन सोडू शकला नाही आणि त्याने दारू आणि धूम्रपानाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवले.

ख्रिस गेल

हे आहेत क्रिकेटमधील सर्वांत मोठे 'बॅड बॉय', एकापेक्षा अनेक मुलींसोबत केलेत अफेअर...

मैदानावर चौकार आणि षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला वेस्ट इंडिजचा हा फलंदाज क्रिकेटच्या मैदानावर गंभीर दिसण्यापेक्षा मैदानाबाहेर नेहमीच मजा करतो. गंगम डान्स आणि मुलींसोबत फ्लर्टिंगसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या ख्रिस गेलला देखील धूम्रपानाचे व्यसन आहे. गेलला अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करताना पाहण्यात आले होते, त्यानंतर ही बातमी मीडियामध्ये हेडलाइन बनली होती.

इयान बोथम

हे आहेत क्रिकेटमधील सर्वांत मोठे 'बॅड बॉय' क्रिकेटर, एकापेक्षा अनेक मुलींसोबत केलेत अफेअर...

इंग्लंड क्रिकेट संघाचा दिग्गज माजी क्रिकेटपटू इयान बोथम याने आपल्या संघाला अनेक वेळा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा लक्ष केंद्रित करणारा आणि शांत दिसणारा इयान बोथम मैदानाबाहेर वेगळी जीवनशैली जगतो. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्राने बोथमचे एक वादग्रस्त छायाचित्र प्रसिद्ध केले होते, ज्यामध्ये तो धूम्रपान करताना दिसत होता. या घटनेनंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याला दोषी मानले आणि त्याच्यावर दोन महिन्यांची बंदी घातली होती .


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *