BAN vs NZ: बांग्लादेशचा सलग तिसरा पराभव, न्यूझीलंडने 8 गडी राखून पराभव करत बनले Table Topper
BAN vs NZ: न्यूझीलंडने आयसीसी वनडे विश्वचषकाच्या 11 व्या सामन्यात बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला. या विश्वचषकात न्यूझीलंडचा हा सलग तिसरा विजय आहे. चेन्नईच्या एमए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 245 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने केन विल्यम्सन आणि डॅ|रेल मिचल यांच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर 43 चेंडू आणि आठ गडी राखून बांगलादेशचा पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडच्या संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
246 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. रचीन रवींद्र हा (9) स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर केन आणि कॉन्वे यांनी न्यूझीलंडचा डाव सावरत 80 धावांची भागीदारी रचली. कॉनवे 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर मिचल आणि केन यानी शतकी भागीदारी केली. केन विलियम्सन 78 धावा काढून रिटायर्ड झाला. त्याच्या हाताला चेंडू लागल्याने तो पुन्हा फलंदाजीस आला नाही. त्यानंतर मिचल (89)आणि फिलिप्स (16) यांनी न्यूझीलंडची पडझड होऊ न देता विजय मिळवून दिला.
BAN vs NZ: सामन्याचे स्कोरकार्ड
पहिल्या डावात बांगलादेशने फलंदाजी करताना 50 षटकात नऊ बाद 285 धावा केल्या. यात यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम याने सर्वाधिक 66 धावा केल्या. मेहंदी हसन मिराज 30 तर शांतो 7 धावा काढून बाद झाले. यानंतर रहीम आणि शाकिब यांनी बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी मिळून 78 धावांची भागीदारी केली. शाकीब 51 चेंडूत 40 धावा काढून माघारी परतला. शेवटच्या षटकात फटकेबाजी करत महंमदुल्ला याने 49 चेंडूत महत्त्वपूर्ण 40 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून एल फर्ग्युसन याने सर्वाधिक तीन गडी बाद केले.
या विश्वचषकात न्यूझीलंडचा हा सलग तिसरा विजय तर बांगलादेशचा सलग तिसरा पराभव आहे. न्यूझीलंडचा संघ या स्पर्धेत जबरदस्त खेळी करत आहे. त्यामुळे या संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. तसेच विश्वचषकात न्यूझीलंड ने आतापर्यंत मिळवलेले सर्वच विजय हे एकतर्फी आहेत. स्पर्धेत शेवटपर्यंत विजयाची लय न्यूझीलंड ने कायम ठेवली तर त्यांना विश्वविजेता होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.
हेही वाचा:
विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..