आयसीसी विश्वचषक 2023मध्ये पाकिस्तानने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. या पराभवसह बांगलादेशचा विश्वचषक 2023 मधला प्रवास अखेर संपला. बांगलादेश हा आयसीसी विश्वचषक 2023 मधून बाहेर पडणारा पहिला संघ बनला. त्यामुळे सेमी फायनलमध्ये खेळण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या या बांगलादेशच्या संघाने अपेक्षित अशी कामगिरी केली नाही. त्यामुळे त्यांना स्पर्धेबाहेर व्हावे लागले.
बांगलादेशचे स्टार फलंदाजानी संपूर्ण स्पर्धेमध्ये निराशा जनक कामगिरी केली. लिटन दास याने चांगली सुरुवात देण्यात अपयशी ठरला तर शांतोची बॅट ही शांतच राहिली. कर्णधार शाकिब उल हसन हा एकाकी लढत असल्याचे दिसून आले. महमूदुल्लाह काही आकर्षक खेळी केल्या. मात्र त्याला इतर फलंदाजाची साथ भेटली नाही. पण त्यावेळी पाणी पुलाखालून बरेच वाहून गेले होते.
बांगलादेशच्या फलंदाजाबरोबर गोलंदाजांनी देखील निराशा जनक कामगिरी केली. मुस्तफिजूर रहमान व टस्किन अहमद सारखे दिग्गज गोलंदाज देखील विकेट घेण्यासाठी तरसत असल्याचे दिसून आले. तसेच मुस्तफाजूर आणि टस्किन हे धावा देण्यात ही पुढे होते. फलंदाजांवर त्यांचा अंकुश राहिला नव्हता.
फिरकी गोलंदाज हे बांगलादेशी मजबूत बाजू मानली जात होते. मात्र यंदाच्या स्पर्धेत त्यांचे फिरकीपटू हे फॉर्मात नव्हते. मेहंदी हसन आणि कर्णधार शाकिब हे महत्त्वाच्या क्षणी विकेट घेण्यामध्ये अपयशी ठरले. वेगवान गोलंदाजांसारखेच फिरकीपटू देखील विकेट घेण्यासाठी तरसत होते. विरोधी संघातील फलंदाज मोठी धावसंख्याची भागीदारी रचत असताना ती भागीदारी तोडण्यासाठी कोणतेच फिरकीपटू यशस्वी ठरले नाहीत.
सामान्य बाबतीत बोलायचे झाले तर, आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानी बांगलादेशचा सात गडी राखून एकतर्फी पराभव केला. या विजयासह पाकिस्तानचे सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा पुन्हा पल्लवी झाल्या आहेत. पाकिस्तानने 205 धावांचे आव्हान 32.3 षटकात केवळ 3 विकेट गमावून पूर्ण केले. फखर जमान याने स्फोटक फलंदाजी करत 81 धावा काढल्या. अब्दुल शफीक यांनी 68 धावांची बहुमूल्य खेळी केली. या विजयामुळे पाकिस्तानचा रन रेट देखील वाढला आहे.