BCCI चा मोठा खुलासा! ईशान किशन, केएस भरत नव्हे तर कसोटी संघात ‘हा’ खेळाडू घेणार रिषभ पंतची जागा
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये येत्या ९ फेब्रुवारी पासून ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी ही मालिका अतिशय महत्वाची असणार आहे. मात्र या मालिकेत भारतीय संघातील यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत खेळताना दिसून येणार नाहीये. रिषभ पंत गेल्या काही वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी करतोय. मात्र काही दिवसांपूर्वी त्याचा अपघात झाल्यामुळे तो या मालिकेत खेळताना दिसून येणार नाहीये. दरम्यान ही मालिका सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने रिषभ पंतच्या जागी कोण खेळणार याबाबत घोषणा केली आहे.
काही दिवसांपूर्वी रिषभ पंतचा अपघात झाला होता. त्यामुळे तो कमीत कमी सहा महिने मैदानापासून दूर असणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुध्द होणाऱ्या मालिकेसाठी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून ईशान किशन आणि केएस भरत यांना संधी दिली आहे. मात्र निवडकर्ते श्रीधरन शरथ यांचे म्हणणे आहे की, कसोटी संघात रिषभ पंत ऐवजी सूर्यकुमार यादवला संधी दिली गेली पाहिजे.
श्रीधरन शरथ यांनी स्पोर्ट्सस्टारला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “सूर्यकुमार यादव हा असा खेळाडू आहे जो, सामना विरोधी संघाकडून दूर घेऊन जाऊ शकतो. तो वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स खेळू शकतो. हे विसरून चालणार नाही की, त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५ हजार पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.” रिषभ पंत आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे सूर्यकुमार यादव रिषभ पंतच्या जागी खेळण्यासाठी परफेक्ट चॉईस आहे. असे श्रीधरन शरथ यांचे म्हणणे आहे.
सूर्यकुमार यादवने आतापर्यंत भारतीय संघासाठी एकूण २० वनडे आणि ४६ टी -२० सामने खेळले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने २८.८७ च्या सरासरीने ४३३ धावा केल्या आहेत. तर टी -२० क्रिकेटमध्ये त्याने १६२५ धावा केल्या आहेत.