2023-24 या नवीन वर्षात BCCI ने जाहीर केलेल्या वार्षिक कॉन्ट्रॅक्ट मध्ये अनेक बदल दिसले आहेत. BCCI ने जाहीर केलेल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अनेक नवीन तसेच युवा खेळाडूंचा समावेश आहेत. परंतु या मुळे बऱ्याच अनुभवी खेळाडूंना या कॉन्ट्रॅक्ट मधून वगळले आहे. तसेच अनेक नवीन युवा खेळाडूंना संधी दिली आहे.
सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मध्ये या खेळाडूंचा समावेश:-
भारतीय क्रिकेट संघात टी-20 सामन्यांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंगचा पहिल्यांदाच या केंद्रीय करारात समावेश करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून रिंकू सिंग चा परफॉर्मन्स खूप चांगला होता. तसेच T20 क्रिकेट मध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध या दोन्ही संघांच्या विरुद्ध अप्रतिम फलंदाजी केली. त्यानंतर 2023-24 च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये सी ग्रेड खेळाडू च्या यादीत रिंकू सिंग चा समावेश झाला. रिंकू सिंग बरोबर रजत पाटीदारचाही सी ग्रेडमध्ये समावेश केला. परंतु श्रेयस अय्यर आणि ईशान किशन या दोन्ही खेळाडूंना BCCI ने कॉन्ट्रॅक्ट मधून बाहेर काढले आहे.
रजत पाटीदार:-
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पहिला एकदिवसीय सामना खेळण्याची रजत पाटीदार ला संधी मिळाली होती. रजत पाटीदारने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. परंतु आतापर्यंत रजत ला कसोटी सामन्यात एकही मोठी यशस्वी इनिंग खेळण्यात यश आलेले नाही. या केंद्रीय करारानंतर बीसीसीआय ने रजत पाटीदार ला कॉन्ट्रॅक्ट मध्ये सामील करून घेतले आहे.
C GRADE खेळाडू:-
सी ग्रेड खेळाडूंच्या यादीत रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड़, शार्दुल ठाकुर, शिवम दुबे, रवि बिश्नोई, जितेश शर्मा, वाशिंगटन सुंदर, मुकेश कुमार, संजू सैमसन, अर्शदीप सिंह, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान, रजत पाटीदार या युवा आणि नवीन खेळाडूंचा समावेश आहे.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हे ही वाचा:-IPL 2024: हे तीन दिग्गज खेळाडू आहेत धोनीच्या कर्णधारपदाचे चाहते, जाणून घ्या सविस्तर.
हे ही वाचा:- T20 World Cup 2024: भारत-पाकिस्तान सामन्याबाबत या दिग्गज खेळाडूचे मोठे विधान