भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) रविवारी,ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या उर्वरित दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात कुठलाही बदल करण्यात आला नाहीये. मात्र बीसीसीआयने केएल राहुलच्या बाबतीत टोकाचं पाऊल उचललं आहे.
उर्वरित दोन कसोटी सामन्यासाठी केएल राहुलला संधी दिली गेली आहे. मात्र त्याचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये त्याला ही जबाबदारी दिली गेली होती. मात्र आता ही जबाबदारी काढून घेण्यात अली आहे. गेल्या काही महिन्यांपासून केएल राहुल सतत फ्लॉप ठरतोय. त्याला संधी मिळतेय मात्र तो धावा करण्यात अपयशी ठरतोय.
त्याच्या जागी शुभमन गिलला संधी देण्याची मागणी केली जात होती. मात्र आता बीसीसीआयने मोठी भूमिका घेतल्यानंतर लवकरच शुभमन गिलला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. ऑस्ट्रेलियाविरुध्द सुरू असलेल्या पहिल्या २ कसोटी सामन्यांमध्ये त्याला केवळ ३८ धावा करता आल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये एक वर्षापासून एकही अर्धशतक नाही..
केएल राहुलने गेल्या एक वर्षापासून कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक किंवा अर्धशतक झळकावले नाहीये. त्याने शेवटचे अर्धशतक जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुध्द झालेल्या मालिकेत झळकावले होते. आतापर्यंत त्याने ४७ कसोटी सामन्यांमध्ये २६४२ धावा केल्या आहेत.
हे ही वाचा..