बेंगळुरू एफसी बनले ड्यूरंड कपचे चॅम्पियन! कोस्टाचा विनर मुंबईवर भारी
रविवारी (18 सप्टेंबर)
कोलकाता येथे झालेल्या ड्युरंड कपच्या अंतिम सामन्यात बेंगळुरू एफसीने मुंबई सिटी एफसीचा 2-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. भारताचा दिग्गज फुटबॉलर असलेल्या सुनील छेत्रीच्या शिरपेच्यात या विजेतेपदामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 2013 मध्ये स्थापन झाल्यापासून भारतातील सर्व प्रमुख फुटबॉल स्पर्धा जिंकणारा बेंगळुरू एफसी पहिला क्लब ठरला आहे.
CHAMPIONS, AGAIN! 🏆 Bengaluru, your Blues are bringing the #DurandCup home. 🔥 #WeAreBFC #MCFCBFC pic.twitter.com/aHaOvjvooM
— Bengaluru FC (@bengalurufc) September 18, 2022
कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामने आयएसएल विजेते संघ समोरासमोर आले. बेंगळुरू एफसीने उपांत्य सामन्यात हैदराबाद एफसीला तर, मुंबई सिटीने मोहमेडन एफसीला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम सामन्यात बेंगळुरूच्या शिवशक्ती नारायण याने 11 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मुंबईच्या अपुया याने 30 व्या मिनिटाला गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत सामना याच स्थितीत राहिला. दुसऱ्या सत्रामध्ये ऍलन कोस्टा याने 61 व्या मिनिटाला झळकावलेला गोल सामन्यातील अखेरचा गोल ठरला. त्यानंतर कोणीही गोल करू न शकल्याने बेंगळुरू एफसीने विजेतेपद आपल्या नावे केले. ड्यूरंड कप स्पर्धेचे हे 131 वे वर्ष होते. ही जगातील तिसरी सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे.