पाकिस्तानचा ‘हा’ फलंदाज आहे विश्वचषक स्पर्धेतला सर्वात कंजूस गोलंदाज; एकही धाव न देता मिळवली होती विकेट

पाकिस्तान क्रिकेट संघाने जागतिक क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू मिळवून दिले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानला वेगवान गोलंदाज तयार करण्याची फॅक्टरी मानली जाते. इम्रान खान, वसीम अक्रम, वकार युनुस शोएब अख्तर यासारख्या दिग्गज गोलंदाजांनी जागतिक क्रिकेट आपल्या धारदार गोलंदाजीने हादरून सोडले होते.

90च्या दशकात या गोलंदाजांनी इन स्विंग, योर्कर सारख्या ब्रह्मास्त्राचा वापर करत आपला धाक निर्माण केला होता. असे असले तरी पाकिस्तान क्रिकेट संघात असा एक फलंदाज आहे, ज्याने विश्वचषक स्पर्धेमध्ये एक ही धाव न देता बळी घेत विक्रम केला होता.

IND vs PAK: असे झाल्यास विश्वचषकात क्रिकेट प्रेमींना पुन्हा पाहायला मिळू शकतो भारत-पाकिस्तानचा हाय वोल्टेज सामना

पाकिस्तानच्या या फलंदाजाने विश्वचषक स्पर्धेमध्ये एकही धाव न देता मिळवला होता बळी.

पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासात एक सर्वोत्तम दिग्गज फलंदाज म्हणून ज्याची ख्याती होते तो खेळाडू म्हणजे युसूफ योहाना होय. 1988 साली त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात झाली होती. युसुफ योहाना हा जन्माने ख्रिश्चन होता कालांतराने त्याने धर्म परिवर्तन केले. 2004 मध्ये धर्मांतर केल्यानंतर त्याने मोहम्मद युसुफ असे नाव ठेवले.

पाकिस्तानच्या संघात मधल्या फळीत खेळणाऱ्या मोहम्मद युसुफने विश्वचषक स्पर्धेत एकूण 13 सामने खेळले आहेत. यात एकही धाव न देता त्याने गडी एक बाद केला आहे. विशेष म्हणजे त्याने विश्वचषक स्पर्धेत एकच चेंडू फेकला आणि त्यात विकेट मिळवला होता.

युसुफने 1998 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहनासबर्ग येथे खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 88 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 53.07 च्या सरासरीने 7431 धावा केल्या तर 282 वनडे सामन्यात 42.39 च्या सरासरीने 9624 धावा केल्या. 2006 मध्ये युसूफने 11 कसोटी सामन्यात 1788 धावा काढल्या. त्यामध्ये दमदार नऊ शतके तर तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्या वर्षात युसुफने 99.33 च्या सरासरीने धावा केल्या होत्या.

पाकिस्तानचा 'हा' फलंदाज आहे विश्वचषक स्पर्धेतला सर्वात कंजूस गोलंदाज; एकही धाव न देता मिळवली होती विकेट

एका कॅलेंडर वर्षामध्ये सर्वाधिक कसोटी धावा काढण्याचा त्याचा विक्रम आजही अबाधित आहे. तसेच त्याने 3 T20 सामने देखील खेळला आहे. पाकिस्तानकडून क्रिकेट खेळताना त्याने एकूण 39 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. एकंदरीतच त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17,300 धावांची नोंद आहे.

2010 मध्ये न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये पाकिस्तानचा दारूण पराभव झाला होता. या पराभवानंतर पीसीबीने मोहम्मद युसुफवर अनिश्चित काळासाठी सामने खेळण्यास प्रतिबंध केला होता. त्याच्यावर संघामध्ये गटबाजी करण्याचा आरोप लावला होता.

पाकिस्तानचा 'हा' फलंदाज आहे विश्वचषक स्पर्धेतला सर्वात कंजूस गोलंदाज; एकही धाव न देता मिळवली होती विकेट

जुलै 2010 मध्ये पाकिस्तानचा इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात मानहानीकारक पराभव झाला होता. मालिका सुरू असतानाच मोहम्मद युसुफला इंग्लंडच्या दौऱ्यावरून माघारी मायदेशात बोलवण्यात आले. हा सामना त्याच्या कारकिर्दीचा शेवटचा सामना ठरला. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.


हेही वाचा: