महेंद्रसिंग धोनीच सर्वोत्तम फिनिशर…! लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत संघाला विजय मिळवून देत सर्वांत जास्त वेळा नाबाद राहिलेले ‘हे’ खेळाडू

0

 

महेंद्रसिंग धोनी: वनडे क्रिकेटमध्ये दिलेल्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत अनेक खेळाडू नाबाद राहतात. संघात फिनिशर ची भूमिका बजावणाऱ्या या खेळाडूचे महत्त्व अन्यन साधारण असते. भारतीय क्रिकेट संघाने जागतिक क्रिकेटला अनेक उत्कृष्ट फिनिशर खेळाडू दिले आहेत. वन डे क्रिकेटमध्ये दिलेल्या लक्षाचा यशस्वीपणे पाठलाग करत शेवटपर्यंत नॉट आउट राहणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तीन भारतीय खेळाडू आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेचे दोन पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया वेस्टइंडीज या संघाचे प्रत्येकी एक खेळाडू आहेत.

महेंद्रसिंग धोनी ते रिकी पोंटिंग.. या 10 खेळाडूंनी सर्वाधिक वेळा नाबाद राहत लक्ष गाठलंय..

महेंद्रसिंग धोनी : वनडे क्रिकेटमध्ये दिलेल्या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग करत संघाला विजय मिळवून देऊन नाबाद राहणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये महेंद्रसिंग धोनी पहिल्या स्थानावर आहे. महेंद्रसिंग धोनीने 47 वेळा नाबाद राहात संघाला विक्रमी विजय मिळवून दिला.

महेंद्रसिंग धोनीच्या नंतर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जॉन्टी रोड्स 33 वनडे सामन्यात विजय मिळवून देत नाबाद राहिला. जगातल्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये त्याची गणना होते. 2003 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये त्याला दुखापत झाल्यानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीनंतर तो इंडियन्स संघाच्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारला.

महेंद्रसिंग धोनीच सर्वोत्तम फिनिशर...! लक्षाचा यशस्वी पाठलाग करत संघाला विजय मिळवून देत सर्वांत जास्त वेळा नाबाद राहिलेले 'हे' खेळाडू

इंजमाम उल हक: पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक हा मधल्या फळीत खेळणारा जबरदस्त फलंदाज होता. त्याने 32 सामन्यात पाकिस्तानच्या संघाला विजय मिळवून देत नाबाद राहिला. तो या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

विराट कोहली: ‘चेसमास्टर’ विराट कोहलीने 32 सामन्यात नाबाद राहात भारताला विजय मिळवून पॅवेलियनमध्ये परतला. आधुनिक क्रिकेटमधला तो सर्वोत्तम फिनिशर मानला जातो.

रिकी पॉंटिंग: ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पॉंटिंग याने 31 सामन्यात नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. वनडे क्रिकेट मधील चेस मास्टर खेळाडूच्या यादीमध्ये तो चौथ्या स्थानावर आहे.

मोहम्मद अझरुद्दीन : भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी 30 सामन्यात नाबाद राहत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

Riki Ponting Yuvakatta

जॅक कॅलीस: आयपीएलमध्ये केकेआर संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारणारा जॅक कॅलीस दक्षिण आफ्रिका संघाकडून खेळताना 30 सामन्यात नाबाद राहत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.

एबी डिव्हिलियर्स : दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने 28 सामन्यात नाबाद राहिला होता.

महिला जयवर्धने: श्रीलंकेचा स्टायलिश फलंदाज माजी कर्णधार व मुंबई इंडियन्स संघाचा प्रशिक्षक महिला जयवर्धने यांनी 27 सामन्यात नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला होता.

 ब्रायन लारा : वेस्टइंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याने 27 सामन्यात मोठे योगदान दिले. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा नाबाद राहत संघाला विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दहाव्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.