या भारतीय फलंदाजाने 443 धावा बनवून तोडणार होता ब्रैडमैन चे रेकॉर्ड, परंतु या कारणाने बंद पडला सामना, जाणून घ्या सविस्तर
क्रिकेट हा आपला राष्ट्रीय खेळ नसला तरी असंख्य क्रिकेट प्रेमी आपल्या देशात आहेत. आणि क्रिकेट खेळाचे दिवसेंदिवस हे वेड वाढतच चालले आहे. अनेक भारतीय खेळाडूंनी असे रेकॉर्ड बनवले आहेत की ते रेकॉर्ड आजपर्यंत कोणीच तोडू शकले नाही. अत्यंत कमीच लोक हे रेकॉर्ड तोडू शकतात.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्याने ब्रैडमैन चे रेकॉर्ड तोडता तोडता राहिले आहे. तर जाणून घेऊया कोण आहे हा भारतीय आक्रमक फलंदाज.
भारतात अनेक आक्रमक फलंदाज आहेत त्यामधील एक म्हणजे सचिन तेंडुलकर आणि कपिल देव. या दोन्ही फलंदाजानी अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. जे आजपर्यंत कोणीच तोडले नाही.
1948 साली महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भाऊसाहेब बाबासाहेब निंबाळकर या खेळाडू ने आक्रमक फलंदाजी करत आपले नाव कोरले आहे. रणजी क्रिकेट ट्रॉफी मध्ये सर्वात आक्रमक खेळाडू म्हणून भाऊसाहेब निंबाळकर यांना ओळखले जायचे. परंतु त्यांना भारतीय संघात खेळता येत नाही.
महाराष्ट्र आणि काठियावाड यांच्यात रणजी करंडक सामना झाला. या सामन्यात काठियावाड संघाने प्रथम फलंदाजी करताना 238 धावा बनवून महाराष्ट्र संघापुढे ठेवले. महाराष्ट्राच्या संघाने पहिल्याच डावात 81 धावांत पहिली विकेट गमावली होती. तसेच 2 विकेट गमवून महाराष्ट्र संघाने 587 धावा बनवल्या.
भाऊसाहेब निंबाळकर या खेळाडूने नाबाद 301 धावा करून पेवेलीयन मध्ये परतले. तिसऱ्या दिवशी सुद्धा भाऊसाहेब निंबाळकर याने चांगली फलंदाजी केली. त्या वेळी भाऊसाहेब निंबाळकर याने 400 पेक्षा अधिक धावा करून नाबाद राहिले. जवळ जवळ भाऊसाहेब निंबाळकर डॉन ब्रैडमैन चे रेकॉर्ड तोडणार होते. परंतु अचानक सामना रद्द झाल्यामुळे रेकॉर्ड तोडणे हुकले.
चहा पिण्याच्या वेळी काठियावाड़ संघाचे कॅप्टन राजकोट के ठाकुर बिदक आले आणि म्हणाले की महाराष्ट्र संघाने आता टीम डिक्लेयर करावी. खूप समजावून सांगितले परंतु ठाकुर बिदक यांनी ऐकले नाही ते आपल्या खेळाडूला घेऊन रेल्वे स्टेशन वर गेले. भाऊसाहेब निंबाळकरने तया सामन्यात 8 तास 14 मिनिटे फलंदाजी करून 46 चौकार आणि एक षटकार मारला होता आणि अवाढव्य स्कोर सुद्धा बनवला होता. परंतु सामना रद्द झाल्यामुळे त्यांना रेकॉर्ड मोडता आले नाही.
हेही वाचा: