IPL 2024: आयपीएल सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाला मोठा झटका: महत्त्वाचा खेळाडू पडला स्पर्धेबाहेर..

IPL 2024: आयपीएल सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाला मोठा झटका: महत्त्वाचा खेळाडू पडला स्पर्धेबाहेर..

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

IPL 2024:  आयपीएल 2024 ला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाला जोरदार झटका बसला आहे. मुंबई इंडियन्स संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज ला दुखापत झाली आहे त्यामुळे तो संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. मुंबई इंडियन्सने या वेगवान गोलंदाजाच्या जागेवर पर्यायी खेळाडू देखील घोषित केला आहे. मागील हंगामात त्याने मुंबई इंडियन्स कडून खेळताना जबरदस्त कामगिरी केली होती. इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामातून जेसन बेहरेनडॉर्फ बाहेर पडला आहे.

==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

IPL RECORDS: आयपीएल मधील हे अविश्वसनीय विक्रम मोडणे जवळपास अशक्यच,कोणत्याही स्टार खेळाडूला सुद्धा जमणार नाही अशी कामगिरी..!

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ याला गंभीर दुखापत झाल्याने यंदाच्या IPL हंगामात तो खेळू शकणार नाही. हा प्रमुख गोलंदाज बाहेर पडल्याने मुंबई इंडियन्सच्या गोटात सध्या चिंतेचे वातावरण आहे. त्याच्या जागेवर एका इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाची नियुक्ती केली आहे. जेसन बेहरेनडॉर्फ याच्या जागी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ल्यूक वूड याची नियुक्ती केली आहे. वूड याचा यंदाचा पहिला आयपीएल हंगाम होईल. त्याला मुंबई इंडियन्सने 50 लाख रुपये देऊन आपल्या संघात सामील करून घेतले.

ल्यूक वुड ने इंग्लंडच्या संघाकडून दोन वनडे आणि पाच टी 20 सामने खेळले आहेत. वनडे मध्ये त्याला एकही विकेट घेता आला नाही तर टी 20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर आठ विकेट घेतल्याची नोंद आहे. ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू जेसन बेहरेनडॉर्फ याने आयपीएलमध्ये 17 सामन्यात 29 विकेट घेतले होते. त्याने मुंबई इंडियन्स कडून खेळताना 12 बारा सामन्यात 14 विकेट आपल्या नावे केले होते. डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या या वेगवान गोलंदाजाने आयपीएल मध्ये प्रभावी कामगिरी केली आहे.

आयपीएल मध्ये मुंबई इंडियंस (MI) यंदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली उतरणार आहे. तर रोहित शर्मा हा खेळाडू म्हणून संघामध्ये सहभागी असेल. त्याच्याच नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरले होते. आयपीएल 2022 मध्ये हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सला विजेतेपद पटकावून दिले होते. मुंबई इंडियन्स ने हार्दिक पांड्याला कर्णधार पदाची ऑफर देताच त्याने गुजरात टायटन्स ला सोडचिट्टी दिली अन तो एमआयच्या संघात दाखल झाला. पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ कशी कामगिरी करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

IPL 2024: आयपीएल सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाला मोठा झटका: महत्त्वाचा खेळाडू पडला स्पर्धेबाहेर..

मुंबई इंडियन्सचा संघ :

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक ), जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंदुलकर, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, विष्णू विनोद, पीयूष चावला, रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्जी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, अंशुल कंबोज, नमन धीर, मोहम्मद नबी, डेवाल्ड ब्रेविस, टिम डेविड, तिलक वर्मा, नेहल वढेरा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *