चेन्नई सुपर किंग्स संघातील ‘या’ अष्टपैलू खेळाडूंनी मारला आहे आत्तापर्यंतचा सर्वात मोठा षटकार,पहा आयपीएलमध्ये सर्वांत लांब षटकार ठोकणारे 10 खेळाडू..

चेन्नई सुपर किंग्स संघातील 'या' अष्टपैलू खेळाडूंनी मारला आहे आत्तापर्यंतचा सर्वात मोठा षटकार,पहा आयपीएलमध्ये सर्वांत लांब षटकार ठोकणारे 10 खेळाडू..

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

Biggest Six IN IPL History: आयपीएल हा फलंदाजाचा खेळ मानला जातो. या लोकप्रिय लीग मध्ये क्रिकेट फॅन्सला चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. लीगमध्ये अनेकदा एकाच षटकात पाच-पाच षटकार ठोकलेले आपण यापूर्वी पाहिले आहे. तुम्हाला माहिती आहे का, यापूर्वी या लीगमध्ये सर्वात लांब षटकार कोणत्या फलंदाजांना ठोकला आहे. चला तर जाणून घेऊया की, आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार ठोकणारे खेळाडू आहेत तरी कोण.

 Biggest Six IN IPL History: हे आहेत आयपीएल मध्ये सर्वाधिक लांब षटकार ठोकणारे खेळाडू.

1. एल्बी मोर्कल

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एलबी मोर्कल याने आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात लांब षटकार खेचला आहे. मोर्कलने चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 124 मीटरचा लांब खणखणीत षटकार ठोकला होता. त्याचा विक्रम अद्याप कोणत्याही खेळाडूला मोडता आला नाही.

ये हैं IPL इतिहास के सबसे लंबे छक्के, इस भारतीय का नाम जानकर चौंक जाएंगे आप - ipl adam gilchrist albie morkel robbin uthappa cricket-mobile

 

2. प्रवीण कुमार

या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे टीम इंडियाचा खेळाडू’ प्रवीण कुमार’. एकेकाळी आपल्या स्विंग ने फलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा मध्यमगती वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारने देखील या लीग मध्ये सर्वात लांब षटकार ठोकला आहे. प्रवीण 2008 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळताना 124 मीटरचा लांब षटकार ठोकला होता. विशेष म्हणजे प्रवीण कुमार हा फलंदाज नसतानाही त्याने सर्वात लांब षटकार ठोकला होता.

चेन्नई सुपर किंग्स संघातील 'या' अष्टपैलू खेळाडूंनी मारला आहे आत्तापर्यंतचा सर्वात मोठा षटकार,पहा आयपीएलमध्ये सर्वांत लांब षटकार ठोकणारे 10 खेळाडू..

3. एडम गिलक्रिस्ट

ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज विकेटकीपर फलंदाज एडम गिलक्रिस्ट याने 2011 मध्ये आरसीबी विरुद्ध खेळताना सर्वात लांब षटकार ठोकला होता. एडम गिलक्रिस्टने 122 मीटर लांब षटकार ठोकला होता.

 

4. रॉबिन उथप्पा

इंडियन प्रीमियर लीग मध्ये सर्वात लांब षटकार ठोकण्यामध्ये भारतीय खेळाडू आघाडीत आहेत. त्यात आणखीन एका खेळाडूचे नाव आहे ते म्हणजे रॉबिन उथप्पा. रॉबिन उथप्पा बंगलोर कडून खेळताना 2010 मध्ये हा कारनामा केला होता. त्याने 120 मीटर लांब षटकार ठोकला होता. रॉबिनने क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती घेतली आहे.

सचिन तेंडुलकर नव्हे तर 'या' कांगारू खेळाडूने ठोकली आहेत सलामीला खेळतांना सर्वाधिक शतके, यादीमध्ये 6 दिग्गज खेळाडूंचा समावेश..!

5. ख्रिस गेल

‘युनिव्हर्सल बॉस’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेल ने इंडियन प्रीमियर लीग मध्ये षटकारांचा पाऊस पडला होता. गेलने 2013 मध्ये 119 मीटरचा लांब षटकार ठोकला होता.

 

 

6. रॉस टेलर

न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलर याने 2008 मध्ये आरसीबी कडून खेळताना 119 मीटर लांबचा षटकार मारला होता. टेलर ने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळताना हा कारनामा केला होता.

 

7. युवराज सिंह

‘सिक्सर किंग’ युवराज सिंहनेदेखील IPL मध्ये जबरदस्त नाव कमवले होते. 2009 मध्ये पंजाब कडून खेळताना 119 मीटर लांबीचा षटकार मारला होता.

चेन्नई सुपर किंग्स संघातील 'या' अष्टपैलू खेळाडूंनी मारला आहे आत्तापर्यंतचा सर्वात मोठा षटकार,पहा आयपीएलमध्ये सर्वांत लांब षटकार ठोकणारे 10 खेळाडू..

8. बेन कटिंग

सनरायझर्स हैदराबाद कडून खेळताना बेन कटिंग याने 2016 साली 117 मीटर लांबीचा षटकार मारला होता. कटिंगने हा षटकार आरसीबी विरुद्ध खेळताना मारला होता.

 

9. लियाम लिविंगस्टन

2022 मध्ये लियाम पंजाब किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळत होता. इंग्लंडच्या या स्फोटक फलंदाजाने 2022 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना 117 मीटर लांबीचा षटकार मारला होता.

 

10. फाफ डुप्लेसी

आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस याने मागील वर्षी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळताना 115 मीटर लांबीचा षटकार मारला होता. डुप्लेसीच्या बॅट मधून निघालेला हा षटकार आयपीएल 2023 मधला सर्वात लांब मारलेला षटकार ठरला.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *