निकोलस पुरनने ठोकला एवढा मोठा षटकार की, विराट कोहली पाहतच राहिला; व्हिडीओ होतोय सोशल मिडीयावर तुफान व्हायरल …

निकलोस पुरनने ठोकला एवढा मोठा षटकार की, विराट कोहली पाहतच राहिला; व्हिडीओ होतोय सोशल मिडीयावर तुफान व्हायरल ...

निकोलस पुरन: लखनऊ सुपर जायंट्स (LSG) ने आयपीएल 2024 मधील 15 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाला (RCB) 28 धावांनी पराभूत केले. लखनऊचा या हंगामातला हा दुसरा विजय आहे. या सामन्यांमध्ये मयंक यादव याने लक्षवेधक कामगिरी केली असली तरी लखनऊच्या एका फलंदाजांनी देखीलआपल्या आक्रमक खेळीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

निकोलसने 21 चेंडूत 39 धावा केल्या होत्या. यात पाच उत्तुंग षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. त्याच्या या धडाकेबाज खेळीच्या जोरावर लखनऊने 20 षटकात पाच बाद 181 धावा करू शकला. प्रतिउत्तरात आरसीबीचा संघ केवळ 153 धावा करू शकला.

निकलोस पुरनने ठोकला एवढा मोठा षटकार की, विराट कोहली पाहतच राहिला; व्हिडीओ होतोय सोशल मिडीयावर तुफान व्हायरल ...

निकोलस पुरनने ठोकला सर्वांत मोठा षटकार..

निकोलस पुरनने लखनऊच्या डावातील 19व्या षटकात 106 मीटर लांबीचा षटकार ठोकला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रॉस टॉप्ली याच्या चेंडूवर त्याने हा मोठा षटकार खेचला. टॉप्लीने या षटकातील तिसरा चेंडू शॉर्ट ऑफ लेन्थ फेकला होता, ज्यावर पूर्ण जबरदस्त फुल शॉट मारला. अन चेंडू स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडला. त्याने या षटकात सलग तीन षटकार खेचले.

यंदाच्या आयपीएल हंगामातला हा सर्वात लांब षटकार ठरला. यासह निकोलस पुरण याने आयपीएल मधील 100 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील केला.

लखनऊ सुपर जायंट्सने 182 धावांचे दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि डुप्लेसी यांनी दमदार सुरुवात करून दिली. पहिल्या चार षटकात 40 धावा जोडल्या गेल्या. कोहली बाद होताच आरसीबीचा डाव गडगडून गेला एकापाठोपाठ एक काही अंतराच्या काळात विकेट पडत गेले आणि संपूर्ण संघ 153 धावांवर बाद झाला.

येथे पहा व्हिडीओ,

https://www.iplt20.com/video/47415/m15-rcb-vs-lsg–nicholas-pooran-six?tagNames=2023

महिपाल लोमरोर याने सर्वाधिक 33 धावा केल्या. रजत पटीदार यांनी 29 धावांचे योगदान दिले. लखनऊ कडून मयंक यादव याने धारदार गोलंदाजी करत चार षटकात 14 धावा ते तीन गडी बाद केले. अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक याने दोन विकेट घेत मोलाचे योगदान दिले.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 आयपीएलच्या इतिहासात ऑरेंज कॅप मिळवणारा हा आहे पहिला विदेशी खेळाडू!

 एकाच मैदानावर सर्वाधिक धावा करणारी हे आहेत खेळाडू! वाचा विराटला कोणते मैदान ठरले लकी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *