गेल्या 11 वर्षापासून हा मनुष्य जखमी झालेल्या पक्षांचा स्वतः उपचार करतोय, आजपर्यंत 1200 हून अधिक पक्षांचे वाचवलेत प्राण..
पक्षी पहायला किंवा त्यांचा किलबिलाट ऐकायला सगळ्यांनाच आवडतं, पण जेव्हा त्यांची काळजी घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा फार कमी लोक पुढे येतात. सध्याच्या काळात वेगवान वाहनांची धडक बसणे, विजेच्या तारांमध्ये अडकून पडणे इत्यादी गोष्टींमुळे अनेक पक्ष्यांचे अपघात होतात. त्याचबरोबर अनेक पक्षांचा मृत्यूही होतो परंतु माणसांच्या व्यस्त जीवनात त्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसते.
पण आपल्यामध्ये एक अशी व्यक्ती आहे जी गेल्या एक दशकापासून जखमी पक्ष्यांची काळजी घेते आणि मृत पक्ष्यांचे अंतिम संस्कार करते. होय वाचून विश्वास बसणार नाही मात्र ही गोष्ट पूर्णपाने खरी आहे. त्या व्यक्तीच्या या उदात्त कार्यामुळे त्यांना ‘बर्ड मॅन’ म्हणून ओळखले जाते. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल अगदी सविस्तर
कोण आहे हा ‘बर्ड मॅन?
आम्ही बोलत आहोत प्रिन्स मेहराबद्दल, जो चंदिगडचा रहिवासी आहे. पक्ष्यांची काळजी घेण्यासाठी त्यांनी आपली सायकल अॅम्ब्युलन्समध्ये बदलली आणि 11 वर्षांपासून जखमी पक्ष्यांवर उपचार करत आहेत यावरून त्यांचे पक्ष्यांवरील प्रेमाचा अंदाज लावता येतो.
ते त्यांच्या सायकलवरून नेहमी शहरात फिरतात त्यादरम्यान त्यांना एखादा जखमी पक्षी आढळला तर ते त्याला उचलतात आणि घरी आणून त्याच्यावर उपचार करतात.आजपर्यंत त्यांनी अश्याच हजारो पक्ष्यांवर उपचार केले आहेत.

पक्ष्यांना किरकोळ दुखापत झाली असेल तर प्रिन्स स्वत: त्यांच्यावर उपचार करतात, पण जर एखाद्या पक्ष्याला मोठी दुखापत झाली असेल, तर तो त्याच्यावर उपचारासाठी प्राण्यांच्या रुग्णालयात घेऊन जातो.
उपचारानंतर जखमी पक्षी निरोगी झाल्यावर त्यांना पुन्हा आकाशात उडण्यासाठी सोडतात. आतापर्यंत, प्रिन्सने 1,150 जखमी पक्ष्यांवर उपचार केले आहेत, तर 1,254 मृत पक्ष्यांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
त्यांचे पक्षीप्रेम पाहता ‘बर्ड मॅन’ हि पदवी त्यांच्यावर शोभून दिसते असच म्हणावे लागेल. त्यांच्या या कामामुळे ते सगळीकडेच प्रसिद्ध झाले आहेत.