भारताचे माजी दिग्गज फिरकिपटू बिशन सिंग बेदी यांचे दुःखद निधन; त्यांच्या ‘मॅजिक स्पेल’मुळेच भारताने विश्वचषकात मिळवला होता पहिला विजय.
भारताचे माजी दिग्गज फिरकिपटू बिशन सिंग बेदी यांचे दुःखद निधन झाले आहे. सोमवारी दुपारी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आपल्या कारकिर्दीमध्ये भल्या-भल्या दिग्गज फलंदाजांना जादुई फिरकीवर नाचविणारे बेदी यांनी भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले होते.
1975 साली दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धा भरवण्यात आली होती. स्पर्धेत भारताचा दुसरा सामना ईस्ट आफ्रिकेबरोबर होता. या सामन्यात त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. सामन्यात 12 षटके गोलंदाजी केली. त्यात 8 षटके निर्धाव टाकली. तसेच एक महत्त्वपूर्ण बळी घेत मॅचमध्ये विरोधी संघाच्या फलंदाजावर एक धाक निर्माण केला होता. त्यानंतर जेव्हा जेव्हा विश्वचषक स्पर्धा येथे तेव्हा बेदी यांच्या मॅजिक स्पेलची आठवण नक्की काढली जाते.
सामन्यात बेदी यांनी विरोधी संघावर तयार केलेल्या दबावाचा फायदा संघातील इतर गोलंदाजांनी घेतला. मदनलाल आणि सय्यद अली यांनी मिळून पाच गडी बाद केले. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर ईस्ट आफ्रिका संघ पत्त्याप्रमाणे कोसळून गेला. ईस्ट आफ्रिकेचा संघ 120 धावांवर सर्व बाद झाला.
बिशन सिंग बेदी यांच्या या ऐतिहासिक स्पेलमुळे भारताने विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदा विजय मिळवला होता. गोलंदाजांनी सामन्यात केलेल्या या चमकदार कामगिरीनंतर फलंदाजानी देखील छाप सोडत धडाकेबाज फलंदाजी केली. सुनील गावस्कर आणि फारूक इंजिनियर यांनी धावांचा पाऊस पडला आणि हा सामना भारताला दहा विकेट्सने एकतर्फी जिंकून दिला. गावस्कर हे 65 तर इंजिनियर हे 54 धावांची नाबाद खेळी केली.
बिशन सिंग बेदी यांनी 1990 साली भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. पूर्वी कोणत्याही संघाला प्रशिक्षका ऐवजी टीम मॅनेजर म्हणून संघात जबाबदारी दिली जायची. भारतीय संघाचे पहिले प्रशिक्षक म्हणून त्यांना ओळखले जाते. सचिन तेंडुलकर यांच्या जडणघडणीत बिशन सिंग बेदी यांचे मोलाचे योगदान आहे. सचिन तेंडुलकर याला ते आपल्या मुला समान मानायचे.
बेदी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 12 वर्षाची कामगिरी ही शानदार राहिली आहे. डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणारे बेदी यांनी 22 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. 1967 मध्ये त्यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 1979 मध्ये त्यांनी भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे 266 विकेट घेतल्याची नोंद आहे. तसेच भारताकडून त्यांनी 10 वनडे सामन्यात प्रतिनिधित्व केले, त्यात त्यांच्या नावावर 7 विकेटची नोंद आहे.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी