मोठी बातमी..! ज्या नियमामुळे इंग्लंड 2019 चा वर्ल्डकप जिंकला तो नियम आता बंद, आयसीसीने घेतला मोठा निर्णय..!

इंग्लंड

मोठी बातमी..! ज्या नियमामुळे इंग्लंड 2019 चा वर्ल्डकप जिंकला तो नियम आता बंद, आयसीसीने घेतला मोठा निर्णय..!


विश्वचषक 2023 (Worldcup 2023) आजपासून म्हणजेच  गुरुवार 5 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. यावेळी पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड (Eng vs nz) यांच्यात होणार आहे. गेल्या वेळी या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला होता.

यावेळी विश्वचषक नियमामध्ये काही बदल देखील करण्यात आले आहेत. त्यापैकी एक नियम तर असा आहे ज्या नियमामुळे इंग्लंडचा संघ 2019 चा विश्वचषक जिंकू शकला होता. नक्की कोणते नियम आयसीसीने यावेळी बंद केले आहेत जाणून घेऊया अगदी सविस्तर..

वर्ल्डकप 2023 सुरु होण्याआधी आयसीसीने रद्द केला हा नियम!

आयसीसीने वर्ल्डकपमधील एक विशेष नियम यावेळ रद्द केला आहे. या नियमामुळेच इंग्लंड संघ 2019 मध्ये चॅम्पियन झाला होता. आयसीसीने सामने आणि सुपर टायनंतर वापरला जाणारा सीमा मोजणीचा नियम रद्द केला आहे. आता हा नियम काय आहे आणि त्यामुळे इंग्लंडला मागच्या वेळी कसे विजेतेपद मिळाले ते जाणून घेऊया.

Odi Worldcup 2023: आजपासून विश्वचषक 2023 ला सुरवात, पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंड एकमेकांना भिडणार, असे असू शकतात दोन्ही संघ आणि त्यांचे प्लेईंग 11

बाउंड्री मोजणी नियम काय आहे?

बाउंड्री मोजणीचा नियम सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी वापरला जातो. अंतिम सामना बरोबरीत सुटल्यावर सुपर ओव्हर घेतली जाते. जर सुपर ओव्हर देखील बरोबरीत असेल तर सीमा मोजण्याचा नियम वापरला जातो. त्यानुसार संपूर्ण सामन्यात सर्वाधिक षटकार आणि चौकार मारणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाते. विश्वचषक २०१९ च्या अंतिम सामन्यात हा नियम वापरण्यात आला होता. मात्र आता आयसीसीने हा नियम  रद्द केला आहे. त्यामुळे विश्वचषक २०२३ मध्ये टाय झाल्यास त्याचा वापर करता येणार नाही.

षटकार आणि चौकार मोजण्याच्या नियमामुळे इंग्लंड 2019 मध्ये चॅम्पियन बनला होता.

वर्ल्ड कप 2019 चा अंतिम सामना लॉर्ड्स, लंडन येथे खेळला गेला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 241 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडनेही 241 धावा केल्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. मात्र यानंतर सुपर ओव्हर घेण्यात आली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये 15 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडनेही 15 धावा केल्या. सामना संपल्यानंतर फायनलची सुपर ओव्हरही टाय झाली. सुपर ओव्हर बरोबरीत सुटल्यानंतर चौकार मोजण्याचा नियम वापरला गेला. संपूर्ण सामन्यात इंग्लंडने 26 षटकार आणि चौकार मारले होते. तर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी 17 चौकार मारले होते. त्यामुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले होते.

इंग्लंड

या निकालामुळे इंग्लंडला वादग्रस्त रित्या विजेतेपद मिळाले होते. जे क्रीडा विश्वातील अनेक दिग्गजांना देखील मान्य नव्हते. मात्र तरीही नियम हा असल्यामुळे इंग्लंड 2019 चे विजेतपद जिंकला.त्यानंतर हा नियम विश्वचषक स्पर्धेतून काढून टाकण्याची मागणी करण्यात येत होती. जी आता पूर्ण झाली आहे.

आयीसीसी मेन्स विश्वचषक 2023 चा पहिला सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. त्याआधी भव्य असा उद्घाटन समारंभ देखील होणार आहे. ज्यात बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री तमन्ना भाटीया,अरजित सिंग यासारखे कलाकार आपली कला सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.


हेही वाचा:

“मला आता सवय झाली आहे..” वर्ल्डकप 2023 साठी भारतीय संघात जागा न मिळाल्यामुळे युजवेंद्र चहल नाराज, पहिल्यांदाच बोलत केला मोठा खुलासा..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.