- Advertisement -

जगातील एकमेव क्रिकेटपटू ज्याने सामन्यात एकही विकेट घेतली नाही किंवा एक ही धाव केली नाही, तरीही तो सामनावीर ठरला.

0 2

 

जगातील एकमेव क्रिकेटपटू ज्याने सामन्यात एकही विकेट घेतली नाही किंवा एक ही धाव केली नाही, तरीही तो सामनावीर ठरला.


आजकाल ची तरुण पिढी ला मोठ्या प्रमाणात क्रिकेट चे वेड आहे. क्रिकेट मधील अनेक सामने तरुण तासनतास बसून बघतात खर तर क्रिकेट हा आपला राष्ट्रीय खेळ नाही परंतु आपल्या देशात सर्वाधिक वेड क्रिकेट खेळाचे आहे. आपल्या देशात लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट चे वेड प्रत्येकाला आहे.

 

क्रिकेट मध्ये अनेक वेगवेगळी रेकॉर्ड आहेत कोणाच्या सर्वाधिक धावा तर कोणाच्या सर्वाधिक विकेट तर सर्वाधिक कॅच असे वेगवेगळे रेकॉर्ड प्रत्येक खेळाडूचे असतात तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्याने आपल्या क्रिकेट करियर मध्ये एक ही धाव काढली नाही आणि 1 ही विकेट घेतली नाही तरी सुद्धा त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाला तर जाणून घेऊया कोण आहे तो खेळाडू.

 

2001 साली वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यां दोन्ही संघात एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा खेळाडू कॅमेरूनला सामनावीर म्हणून निवडण्यात आले होते. त्या सामन्यात 2 गोलंदाजांनी 3 बळी घेतले. पण तरीही सामनावीर म्हणून कॅमेरूनची निवड करण्यात आली. यासह एकही विकेट न घेता किंवा धावा न घेता सामनावीराचा पुरस्कार जिंकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर झाला.

 

 

 

 

त्या सामन्यात कॅमेरूनने एकही विकेट घेतली नसावी. पण 10 षटकांपैकी त्याने 2 मेडन षटके टाकली आणि फक्त 20 धावा दिल्या होत्या. अशा परिस्थितीत त्याने आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कॅमेरून मुळेच संघाला विजया पर्यंत पोहचता आले. त्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला 5 गडी बाद होऊन 266 धावा करता आल्या, त्याला प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने 9 गडी गमावून 239 धावा केल्या होत्या.


Leave A Reply

Your email address will not be published.