ODI Records: ‘या’ 6 भारतीय दिग्गज गोलंदाजाने वन-डे क्रिकेटमध्ये घेतलेत सर्वाधिक बोल्ड विकेट..
ODI Records: भारतीय क्रिकेट संघाला सुरुवातीपासूनच वेगवान गोलंदाजाची कमतरता भासत होती. वेगवान गोलंदाजाची कमतरता भारतीय फिरकी गोलंदाज भरून काढायचे. 80 आणि 90 च्या दशकांमध्ये कपिल देव यांनी एक हाती किल्ला लढवला. कपिल देव यांच्या निवृत्तीनंतर श्रीनाथने काही काळ वेगवान गोलंदाजीची धुरा यशस्वीपणे सांभाळली. त्यानंतर झहीर खान यांनेही बहुमोल असे योगदान दिले.
2008 पासून आयपीएलचे युग सुरू झाले आणि भारतीय क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाजाची वाणवा ही कमी व्हायला सुरुवात झाली. आज जागतिक क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांनी आपला एक धाक निर्माण केला आहे. याच भारतीय गोलंदाजांनी जागतिक क्रिकेटमध्ये किती फलंदाजांना त्रिफळाचीत केले आहे, याची माहिती जाणून घेणार आहोत.
या’ 6 भारतीय दिग्गज गोलंदाजाने वन-डे क्रिकेटमध्ये घेतलेत सर्वाधिक बोल्ड विकेट..
अनिल कुंबळे: भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे हा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर त्याने 271 वनडे सामन्यात 92 फलंदाजांना बोल्ड केले आहे. फलंदाजांना सर्वाधिक वेळा त्रिफळाचीत करण्याऱ्या भारतीय गोलंदाजाच्या यादीत तो पहिल्या स्थानावर आहे.
जहीर खान: अनिल कुंबळे नंतर जहीर खान हा दुसऱ्या स्थानावर येतो. त्याने त्याच्या 200 वनडे सामन्यामध्ये 81 फलंदाजांना चकवून क्लीन बोल्ड केले. यॉर्कर चेंडू टाकणे हे त्याचे प्रमुख अस्त्र होते.
जवागल श्रीनाथ: 1990 च्या दशकामध्ये भारतीय वेगवान गोलंदाजीचे धुरा सांभाळणारा जवागल श्रीनाथ 229 वनडे सामन्यात 80 फलंदाजांना क्लीन बोल्ड केले. सध्या जवागल श्रीनाथ हा आयसीसीच्या पॅनलमध्ये मॅच रेफ्री म्हणून काम पाहत आहे.
कपिल देव : भारतीय क्रिकेट संघाला पहिल्यांदा विश्वचषक जिंकून देण्याची किमया करणारे कपिल देव यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 225 वनडे सामन्यात 79 फलंदाजांना त्रिफळाचीत केले.
अजित आगरकर : भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी आपल्या वनडे कारकीर्दीत 191 सामन्यांमध्ये 71 फलंदाजांना क्लीन बोल्ड केले आहे.
मोहम्मद शमी : मोहम्मद शमी याने 96 वनडे सामन्यांमध्ये 60 फलंदाजांना क्लीन बोल्ड करून टाकले आहे. सर्वाधिक बोल्ड विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाच्या यादीमध्ये शमी हा सहाव्या स्थानावर आहे. 32 वर्षीय शमी अजून दोन-चार वर्ष क्रिकेट सहज खेळू शकतो. त्यामुळे या सर्वांना तो मागे टाकू शकतो.
हेही वाचा:
- ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.
- .शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..
- टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..