Most Wickets in Test: या 5 भारतीय गोलंदाजांनी घेतलेत कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स, यादीमध्ये एक माजी कर्णधारही सामील..!

Most Wickets in Test: या 5 भारतीय गोलंदाजांनी घेतलेत कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स, यादीमध्ये एक माजी कर्णधारही सामील..!

Most Wickets in Test: भारतीय क्रिकेट संघामध्ये आतापर्यंत अनेक असे गोलंदाज होऊन गेले आहेत ज्यांनी आपल्या कामगिरीने संपूर्ण जगतात आपली ओळख निर्माण केली. भारतीय क्रिकेटच्या या ताऱ्यांनी दिग्गज देशाच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. कसोटी क्रिकेटमधेही भारतीय संघाचे असेच काही स्टार गोलंदाज होते ज्यांनी विरोधी संघाचे कंबरडे मोडून संपूर्ण सामना आपल्या बाजूने झुकवला होता.

दिग्गज क्रिकेटपटूने भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी धरली इंग्लंडची वाट; खेळणार काउंटी क्रिकेट

आज या विशेष लेखामध्ये आम्ही तुम्हाला भारतीय संघाकडून खेळतांना सर्वांत जास्त कसोटी विकेट मिळवणाऱ्या गोलंदाजाबद्दल माहिती देणार आहोत. हे गोलंदाज आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये प्रसिद्ध झाले ते त्यांच्या अनोख्या गोलंदाजी शैलीमुळे आणि त्यांच्या आकडेवारीमुळे.. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत ते गोलंदाज ज्यांनी कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट (Most Wickets in Test) आपल्या नावावर केले आहेत.

Most Wickets in Test: या भारतीय गोलंदाजांनी घेतलेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स (Bowler who  got most wickets in test Cricket)

Most Wickets in Test: या 5 भारतीय गोलंदाजांनी घेतलेत कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स, यादीमध्ये एक माजी कर्णधारही सामील..!
Most Wickets in Test:

अनिल कुंबळे (Anil Kumble) (६१९/१३२) 

भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा मान अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) नावावर आहे, ज्याने 1990 ते 2008 दरम्यान 132 कसोटी सामने खेळताना 619 विकेट्स घेतल्या. अनिल ने 29.65 च्या सरासरीने या विकेट्स घेतल्या आहेत, तर त्याने 35 वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स आणि एका सामन्यात आठ वेळा दहा किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. अनिल कुंबळे ची ही आकडेवारी त्याला भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत दिग्गज गोलंदाज बनवते..

कपिल देव (Kapil Dev) (४३४/१३१)

भारताकडून कसोटी विकेट घेण्याच्या बाबतीत भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि  अनुभवी अष्टपैलू  खेळाडू कपिल देव (Kapil Dev) दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 1978 ते 1994 पर्यंत 131 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले असून 29.64 च्या सरासरीने 434 विकेट घेतल्या. कपिल हा भारताचा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज आहे, ज्याने 23 वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स आणि एका सामन्यात दोनदा दहा किंवा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

Most Wickets in Test: या 5 भारतीय गोलंदाजांनी घेतलेत कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स, यादीमध्ये एक माजी कर्णधारही सामील..!

IPL 2024: या 5 कारणामुळे आरसीबी यंदाही ट्रॉफी जिंकू शकणार नाही, प्लेऑफमधून सर्वांत आधी होणार बाहेर…!

हरभजन सिंग (Harbhajan Singh) (४१७/१०३)

टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेण्याच्या बाबतीत फिरकीपटू हरभजन सिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. टर्बनेटर या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या या गोलंदाजाने 1998 ते 2015 दरम्यान 103 कसोटी सामन्यांमध्ये 32.47 च्या सरासरीने 417 विकेट्स घेतल्या आहेत. या कालावधीत त्याने 25 वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी आणि पाच वेळा एका सामन्यात दहा किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.

झहीर खान (zaheer khan) (३११/९२)

Most Wickets in Test: या 5 भारतीय गोलंदाजांनी घेतलेत कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स, यादीमध्ये एक माजी कर्णधारही सामील..!

वेगवान गोलंदाज झहीर खान टीम इंडियासाठी कसोटी विकेट घेण्याच्या बाबतीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने 2000 ते 2014 दरम्यान 92 कसोटी सामने खेळले आणि 32.94 च्या सरासरीने 311 बळी घेतले. 11 वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणारा झहीर भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसरा वेगवान गोलंदाज आहे.

आर अश्विन  (Ravi Ashwin)(२६९/४७)

2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या आर अश्विनने आतापर्यंत 47 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले असून 24.79 च्या सरासरीने 269 विकेट्स घेतल्या आहेत. या कालावधीत, त्याने 25 वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स आणि सात वेळा सामन्यात दहा किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात 6/41 धावा करत त्याने हा दर्जा मिळवला. अश्विनने 67 कसोटीत 266 विकेट घेणाऱ्या बिशनसिंग बेदीला मागे टाकले आहे आणि भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पाच गोलंदाजांमध्ये त्याने स्वत:ला स्थान दिले आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :  फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..

Viral video: कोलकत्ता नाईट रायडर्सच्या बालेकिल्ल्यात जॉस बटलरचा धमाका, ठोकले IPL मधली मधील सातवे धडाकेबाज शतक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *