कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांना सर्वाधिक वेळा शून्यावर बाद करणारे ‘हे’ आहेत दिग्गज गोलंदाज!

कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांना सर्वाधिक वेळा शून्यावर बाद करणारे 'हे' आहेत दिग्गज गोलंदाज!

कोणत्याही गोलंदाजाला फलंदाजाला शून्यावर बाद करायला आवडते. त्यासाठी जीव तोडून तो मेहनत घेत असतो. जागतिक क्रिकेटमध्ये असे काही गोलंदाज आहेत, ज्यांनी फलंदाजांना शून्यावर बाद करण्याचा एक आगळावेगळा विक्रम केला आहे. काही खेळाडूंनी तर यामध्ये शतक ठोकले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजाचे वर्चस्व राहिले आहे. 

1.जेम्स अँडरसन

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 115 खेळाडूंना शून्य धावसंख्येवर बाद केले आहे. सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तो पहिल्या स्थानावर आहे. जिमी क्रिकेटमध्ये 187 कसोटी सामने खेळला आहे. नुकतेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा तो पहिला वेगवान गोलंदाज आहे. 2003 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांना सर्वाधिक वेळा शून्यावर बाद करणारे 'हे' आहेत दिग्गज गोलंदाज!

2.  ग्लेन मॅग्राथ

वेस्टइंडीजचे माजी वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्श यांचा कसोटी क्रिकेटमधला 500 हून अधिक बळी घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅग्राथ याने मोडीत काढला होता. 1993 ते 2007 या कालावधीत त्याने 124 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळला होता. यात त्याला 563 विकेट घेण्यात यश मिळाले. 24 धावा देत आठ गडी बाद करण्याचा पराक्रम त्याने केला होता. त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये 104 फलंदाजांना शून्य धावसंख्येवर बाद केले होते. 

4.स्टुअर्ट ब्रॉड

जेम्स अँडरसनचा साथीदार स्टुअर्ट ब्रॉड याने क्रिकेटमध्ये 167 कसोटी सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा तो जगातला दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने 87 फलंदाजांना शून्य धावसंख्येवर बाद केले. इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाने 604 बळी बाद करण्याचा पराक्रम केला होता. 15 धावा देत आठ बळी बाद करण्याची ही त्याची सर्वोच्च कामगिरी ठरली. गतवर्षी त्याने कसोटी क्रिकेटला राम राम ठोकला. 2007 टी 20 क्रिकेटमध्ये त्याच्या एकाच षटकात युवराज सिंगने सहा षटकार ठोकले होते.


5.मुथया मुरलीधरन

श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथया मुरलीधरनने 90च्या दशकात आपल्या धारदार गोलंदाजीने भल्याभल्या दिग्गज फलंदाजाची बोलती बंद केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 800 विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याचा हा विक्रम मोडणे जवळपास कोणत्याही खेळाडूला अशक्यच आहे. सध्या ते सीएसके संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक आहेत.

6.शेन वॉर्न

Shane Warne death COVID 19 vaccine know what doctors said - कोरोना वैक्सीन के कारण हुई शेन वार्न की मौत? जानें डॉक्टर्स ने क्या कहा | Jansatta

ऑस्ट्रेलियाचे दिवंगत गोलंदाज शेन वॉर्न यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 102 फलंदाजांना शून्यावर बाद केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 145 सामन्यात 708 कसोटी विकेट घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांचा हा विक्रम अद्याप कोणत्याही गोलंदाजाला मोडत आला नाही. तसेच वन डे क्रिकेटमध्ये 194 सामन्यात 293 विकेट घेतले आहेत.

आयपीएल मधील 55 सामन्यात 57 विकेट घेतल्याची नोंद आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली आयपीएल 2008 मध्ये राजस्थान रॉयल्स ने पहिल्यांदा  चषकावर नाव कोरले होते. 52 वर्षीय वॉर्न यांनी 2022 मध्ये थायलंड येथे अखेरचा श्वास घेतला. अचानक झालेल्या मृत्यूनंतर संपूर्ण विश्व क्रिकेट शोक सागरात बुडाला होता. 


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.