ODI Records: एकदिवशीय क्रिकेटमध्ये या 6 गोलंदाजांनी सर्वांत तेज 100 विकेट घेतल्यात, एकाने तर खेळले होते फक्त एवढे सामने..

ODI Records: एकदिवशीय क्रिकेटमध्ये या 6 गोलंदाजांनी सर्वांत तेज 100 विकेट घेतल्यात, एकाने तर खेळले होते फक्त एवढे सामने..

ODI Records: अलीकडेच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 बळी पूर्ण केले आहेत. या 100 विकेट्ससह त्याने नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. तो आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. येथे आम्ही तुम्हाला वनडेमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेणाऱ्या टॉप 6 गोलंदाजांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरवात करूया आजच्या या विशेष फिचरला..

एकदिवशीय क्रिकेटमध्ये या 6 गोलंदाजांनी सर्वांत तेज 100 विकेट घेतल्यात  (bowlers who took fastest 100 ODI wickets)

 

1. मिचेल स्टार्क, 52 सामने

सलग 140 किमी. ताशी वेगाने गोलंदाजी करणारा स्टार्क आज जागतिक क्रिकेटमधील सर्वात धोकादायक गोलंदाजांपैकी एक आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने 52 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली.

AUS vs PAK: मिचेल स्टार्क ने स्विंगचा बादशहा वसीम आक्रमच्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी

त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत, स्टार्कने पहिल्या 28 सामन्यांमध्ये 49 विकेट घेतल्या, तर त्यानंतरच्या 24 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 52 विकेट घेतल्या. या 26 वर्षीय गोलंदाजाने 2010 मध्ये भारताविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला ज्यामध्ये त्याने एकही विकेट घेतली नाही.

2. सकलेन मुश्ताक, 53 सामने

पाकिस्तानचा माजी ऑफस्पिनर सकलेन मुश्ताकची त्याच्या काळातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांमध्ये गणना केली जात असे. विशेषतः मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाजांना चकमा देण्यात तो पटाईत होता. याच कारणामुळे त्याने 19 वर्षे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद विकेट्सचे शतक पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला.

त्याने 53 एकदिवसीय सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. 1997 मध्ये भारतात झालेल्या पेप्सी इंडिपेंडन्स कपमध्ये 12 मे रोजी ग्वाल्हेरमध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता. सकलेनने या सामन्यात 9.5 षटकात 43 धावा देत 3 बळी घेतले. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 169 एकदिवसीय सामने खेळले आणि 288 विकेट घेतल्या.

ODI Records: एकदिवशीय क्रिकेटमध्ये या 6 गोलंदाजांनी सर्वांत तेज 100 विकेट घेतल्यात, एकाने तर खेळले होते फक्त एवढे सामने..

3. शेन बाँड, 54 सामने

न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँडचे नाव वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाँडने आपल्या ५४व्या एकदिवसीय सामन्यात ही कामगिरी केली होती. 23 जानेवारी 2007 रोजी अॅडलेडमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात बाँडने मॉन्टी पानेसरला आपला 100 वा बळी बनवला. या सामन्यात त्याने 9.5 षटकात 32 धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या. बाँडने 82 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 147 विकेट घेतल्या.

4. ब्रेट ली, 55 सामने

ब्रेट ली, त्याच्या काळातील सर्वात वेगवान गोलंदाज, एकदिवसीय क्रिकेटमधील त्याच्या 55 व्या सामन्यात 100 बळी घेण्याचा विक्रम केला होता. 25 जानेवारी 2003 रोजी त्याने इंग्लंडविरुद्ध खेळताना 100वी विकेट घेतली. त्यावेळी तो केवळ ३ वर्षे एकदिवसीय क्रिकेट खेळत होता. लीच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 221 सामन्यात एकूण 380 विकेट घेतल्या.

ODI Records: एकदिवशीय क्रिकेटमध्ये या 6 गोलंदाजांनी सर्वांत तेज 100 विकेट घेतल्यात, एकाने तर खेळले होते फक्त एवढे सामने..

5. इम्रान ताहिर, 58 सामने

दक्षिण आफ्रिकेचा लेगस्पिनर इम्रान ताहिरचे नाव वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट्सच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. 37 वर्षीय ताहिरने वनडेत 100 विकेट घेण्यासाठी केवळ 58 सामने खेळले. 15 जून 2016 रोजी वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध मार्लोन सॅम्युअल्सला बाद करून त्याने हे यश मिळवले.

6. वकार युनूस, 59 सामने

या यादीत पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वकार युनूसचे नाव सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने झिम्बाब्वेचा कर्णधार डेव्ह हॅटनला आपला 100 वा बळी बनवले. 1 फेब्रुवारी 1993 रोजी शारजाह येथे खेळल्या गेलेल्या विल्स ट्रॉफी दरम्यान त्याने 59 व्या सामन्यात ही कामगिरी केली.


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *