क्रीडा

BOXING DAY TEST LIVE: फलंदाजाने मारला जबरदस्त फटका मात्र फिल्डरने घेतला तेवढाच जबरदस्त झेल, सुपरमेन सारखी उडी मारून केले बाद, व्हिडीओ सोशल मिडीयावर होतोय तुफान व्हायरल..

BOXING DAY TEST LIVE: फलंदाजाने मारला जबरदस्त फटका मात्र फिल्डरने घेतला तेवढाच जबरदस्त झेल, सुपरमेन सारखी उडी मारून केले बाद, व्हिडीओ सोशल मिडीयावर होतोय तुफान व्हायरल..


क्रिकेटच्या मैदानात एकापेक्षाएक सरस कॅच पकडल्या जातात. या कॅच पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत बॉक्सिंग डे टेस्ट सुरु आहे. या कसोटीत एक जबरदस्त कॅच पहायला मिळाली. या कॅचने 3 सेकंदात बॅट्समनचा खेळ संपवला. बॅट्समन खराब फटका खेळला नव्हता. त्याने कव्हर्सच्या दिशेने जोरदार शॉट मारला होता. पण तिथे उभ्या असलेल्या फिल्डरने तितकीच कमालीची कॅच पकडली. या फिल्डरच कराव तेवढं कौतुक कमी आहे.

मार्नस लाबुशेनने ही कॅच पकडली. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज खाया जोंडोने कव्हर्सच्या दिशेने शॉट मारला होता. मिचेल स्टार्कच्या चेंडूवर त्याने जोरदार फटका मारला होता. लाबुशेन ही कॅच घेतली नसती, तर चेंडू थेट सीमारेषेपार गेला असता. पण असं झालं नाही.

जोंडोने फटका खेळल्यानंतर चेंडू गोळीसारखा वेगात होता. त्यावेळी लाबुशेनने डाइव्ह मारुन कॅच घेतली. ज्यांनी कोणी हा झेल पाहिला, ते हैराण झाले. पाहताना ही कॅच सोपी वाटते, पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. लाबुशेनने अत्यंत सुंदररित्या ही कॅच पकडली. फक्त 3 सेकंदात बॅट्सनचा खेळ संपला.

खाया जोंडोने 19 चेंडूत 5 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या डावातील हा पाचवा विकेट होता. लाबुशेनच्या कॅचमुळे मिचेल स्टार्कला दुसरी विकेट मिळाली. लाबुशेनने ही कॅच पकडण्याआधी डीन एल्गर रनआऊट केलं. ऑस्ट्रेलियान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 189 धावात आटोपला, दक्षिण आफ्रिकेकडून मार्के जॅनसनने सर्वाधिक 59 धावा केल्या. कॅमरुन ग्रीनने सर्वाधिक 5, मिचेल स्टार्कने 2, स्कॉट बोलँड आणि नॅथन लायनने प्रत्येकी 1 विकेट घेतला.


हेही वाचा:

“हरणे किंवा जिंकणे हे मुद्दाम….” श्रीलंकेविरद्धच्या ट्वेंटी आणि एकदिवशीय संघात संधी न मिळाल्यामुळे शिखर धवन नाराज, व्हिडीओ पोस्ट करत साधला बीसीसीआयवर निशाणा, पहा व्हायरल होत असलेला व्हिडीओ..

पदार्पणाच्या 6 महिन्यातच भारतीय युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला आजवरचा पहिला युवा गोलंदाज..

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का… तब्बल 17.50 कोटी जाणार पाण्यात? करोडोंची बोली लावलेला हा खेळाडू नाही खेळाडू शकणार आयपीएल 2023!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
TEAM INDIA के प्लेअर्स ने खेली होली, बीसीसीआय ने शेअर किये PHOTO IRAL अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सुंदर अदानी लुटली मेहफिल, पहा PHOTO 3 indian player who cant play against shrilanka in odi series VIRAL PHOTO:अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक! महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या ट्रेडीशनल लुकवर चाहते फिदा,