Cricket News

IND vs NZ: दोन दशकानंतर रोहितच्या सेनेने किवी संघाचे छाटले पंख: भारताचा विश्वचषकात विजयी पंच!

IND vs NZ : आयसीसी विश्वचषक(World Cup 2023) स्पर्धेतील 21व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. विश्वचषक स्पर्धेतील टॉपवर असलेल्या या दोन संघामध्ये हाय व्होल्टेज सामना झाला. यामध्ये चेसमास्टर विराट कोहलीने (Virat Kohli) दबंग स्टाईलने 95 धावा काढत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तब्बल 20 वर्षानंतर म्हणजेच दोन दशकानंतर भारतीय संघाने न्यूझीलंडचा विश्वचषक स्पर्धेत पराभव केला आहे. (team India beat new Zealand in world cup)

विश्वचषक स्पर्धेतील हा भारताचा सलग पाचवा विजय आहे. या विजयासह भारत गुण तालिकेत टॉपवर आहे. तसेच या विजयामुळे भारताने सेमी फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. न्यूझीलंड संघाने दिलेले 273 धावांचे आव्हान भारतीय संघाने सहा गड्यांच्या मोबदल्यात 274 धावा करून हे आव्हान सहज पार केले.

Viral Video: मोहम्मद शमीने टाकला एवढा जबरदस्त चेंडू की, विल यंगला काही कळायच्या आत झाला क्लीन बोल्ड, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

IND vs NZ: भारतीय सलामीवीर शुभमन-रोहितनी केली चांगली सुरवात.

लक्षाचा पाठलाग करतांना शुभमन गिल (Shubhman Gill) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी सलामीला खेळताना 71 धावांची भागीदारी केली. त्यानंतर गिल 21 धावा काढून लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर बाद झाला. रोहित शर्मा याने 40 चेंडूत 46 धावा काढत बाद झाला. त्याला लॉकी फर्ग्युसनने बाद केले. श्रेयस अय्यर ने 33 धावांचे योगदान दिले. त्याला बोल्ट ने बाद केले. के एल राहुल (27)आणि सूर्यकुमार यादव (2)हे झटपट बाद झाल्यानंतर भारतीय संघ काही काळ अडचणीत दिसला.

IND vs NZ: विराट कोहलीचे शतक हुकले.

त्यानंतर विराट कोहलीने आपल्या अनुभवाचा वापर करत रवींद्र जडेजाच्या साथीने भारतीय संघाला लक्ष्याच्या जवळ आणून ठेवले. भारतीय संघाला विजयासाठी पाच धावा कमी असताना विराट कोहली 95 धावांवर बाद झाला. शतक पूर्ण करण्यासाठी त्याला पाच धावा कमी पडल्या. शतक पूर्ण करण्याच्या नादात आक्रमक खेळताना तो झेलबाद झाला. बाद झाल्यानंतर विराटच्या चेहऱ्यावर नाराजीचा सूर दिसून आला. अखेर रवींद्र जडेजा याने मॅट हेन्री याच्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम न्यूझीलंडला फलंदाजीस प्रचारण केले. न्यूझीलंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. शून्य धाव संख्येवर डेव्हिड कॉन्वे माघारी परतला. विश्वचषक स्पर्धेत पहिला सामना खेळणाऱ्या शमीने त्याला क्लीन बोल्ड केले. मोहम्मद सिराजने विल यंग याला 17 धावांवर बाद केले.

त्यानंतर रवींद्र रचीन आणि डॅरेल मिचल यांनी न्यूझीलंडचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी शतकीय भागीदारी केली. रवींद्र रचीन याने 87 चेंडूत 75 धावांची खेळी केली. यात सहा चौकार व एका षटकारांचा समावेश होता. डॅरल मिचल याने 129 चेंडूत 130 धावा केल्या या खेळीत त्याने नऊ चौकार आणि पाच षटकार ठोकले. या दोघांच्या खेळीच्या जीवावर न्यूझीलंड संघाने 50 षटकात सर्व बाद 273 धावा केल्या.

IND vs NZ

मोहम्मद शमी याने 54 धावा देत पाच गडी बाद केले तर सिराज आणि बुमराह यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला तर कुलदीप यादवने दहा षटकात 76 धावा देत दोन गडी बाद केले. रवींद्र जडेजाला एकही गडी बाद करता आला नाही. मोहम्मद शमीने या सामन्यात भेदक गोलंदाजी करत सर्वांना प्रभावित करून टाकले. पहिल्या चार सामन्यात बेंचवर बसून असलेल्या शमीने सारा राग न्यूझीलंडच्या फलंदाजांवर काढला. रोहित शर्माने शार्दुल ठाकूरच्या जागी आज शमीला संधी दिली होती. त्या संधीचे सोने करत त्याने न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले.


हेही वाचा:

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button