IND vs ENG: टीम इंडियाच्या ची नजर 112 वर्ष जुन्या विक्रमाकडे, धर्मशाला कसोटी सामना जिंकताच भारतीय संघाची नावी मोठा विक्रमाची नोंद.

0
22
ad

 

क्रिकेट आपल्या देशातील लोकप्रिय खेळ आहे. तसेच भारतीय क्रिकेट संघ हा जगभरात प्रसिद्ध तसेच कठीण संघ म्हणून ओळखला जातो. आपल्या भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू आहेत ज्यांच्या नावी अतिशय भयंकर रेकॉर्ड आहेत जे रेकॉर्ड बनवणे आणि तोडणे सुद्धा खूप कठीण आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखात भारत विरुद्ध इंग्लंड हा 5 वा टेस्ट सामना भारताने जिंकला तर 112 वर्ष जुना असलेला रेकॉर्ड भारत मोडेल आणि भारतीय संघाच्या नावी एक नवीन इतिहास रचला जाईल.

 

Cricket 9

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघात उद्या म्हणजे 7 मार्च ला शेवटचा सामना खेळला जाईल. हा सामना धर्मशाला मधील हिमाचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम मध्ये खेळाला जाणार आहे. टीम इंडियाने या मालिकेत 3-1 असा विजय मिळवला आहे. परंतु विरुद्ध संघाची नजर ही 4-1 ने मालिका जिंकण्यावर असेल. जर भारतीय संघाने हा सामना जिंकला तर 112 वर्ष जुन्या रेकॉर्ड ब्रेक होईल आणि भारतीय क्रिकेट संघाचा नाव इतिहासात लीहले जाईल.

 

 

टीम इंडियाची 112 वर्ष जुन्या विक्रमावर नजर:-

या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु त्यानंतर भारतीय संघाने शानदार खेळी करत पुनरागमन केले आणि सलग तीन सामने जिंकून मालिकेत अजेय आघाडी घेतली. अशा परिस्थितीत जर भारतीय क्रिकेट संघाने धर्मशाला येथील शेवटची कसोटी जिंकण्यात यशस्वी ठरली, तर पहिला सामना गमावल्यानंतर पाच सामन्यांची कसोटी मालिका 4-1 ने जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरेल कारण 1912 नंतर असा रेकॉर्ड कोणताच संघ बनवू शकला नाही.

 

 

आत्तापर्यंत फक्त 2 संघ हे करू शकले असते हा रेकॉर्ड:-

कसोटी मालिकेतील पहिला सामना दोनदा गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने 4-1 अशी मालिका जिंकली होती. त्याचबरोबर इंग्लंडच्या संघाने एकदा असा पराक्रम केला होता.

साल 1897- 98 आणि 1901-02 सालामध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने 4-1 ने मालिका जिंकली. त्याचवेळी 1911-12 मध्ये पहिला सामना गमावूनही इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

 

5 व्या टेस्ट मॅच लढती साठी सज्ज भारतीय संघ:-

रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह , यशस्वी जैसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल, केएस भरत, देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप या खेळाडूंचा समावेश संघात असेल.

 

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

हे ही वाचा:- .WPL: 31 वर्षीय खेळाडूने WPL मध्ये इतिहास रचला, हा रेकॉर्ड बनवणारी पहिली महिला फलंदाज.

 

हे ही वाचा:- ‘.‘फिफ्टी आणि सेंच्युरी म्हणजे टाइमपास करणे’, हार्दिक पांड्याने दिली या दिग्गज खेळाडूंना खुन्नस.