या 3 भावांच्या जोड्या ज्या भविष्यात भारतीय संघासाठी सोबत क्रिकेट खेळतील, जाणून घ्या कोण आहेत त्या जोड्या.
सध्या जगभरात क्रिकेट चे प्रेम आणि क्रिकेट चे वेड दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तसेच वेळेबरोबर तसेच काळाबरोबर भारतीय संघातील खेळाडू सुद्धा बदलत आहेत. सध्या क्रिकेट मध्ये टिकून राहण्यासाठी सतत फॉर्म मध्ये राहणे. तसेच दिवसेंदिवस क्रिकेट मध्ये सुद्धा मोठी स्पर्धा वाढलेली आहे. प्रत्येक जण टिकून राहण्यासाठी धडपड करत आहे.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या भावांच्या जोडी विषयी सांगणार आहे ज्या जोड्या येणाऱ्या आगामी काळात भारतीय संघासाठी खेळतील.
सिंह बंधू:-
क्रिकेट खेळणाऱ्या जोड्यांमध्ये सिंह बंधू यांचे नाव पहिल्या स्थानावर आहे. प्रभिसरण सिंह आणि अनमोलप्रीत सिंह अशी या बंधूंची नावे आहेत. हे दोघे भाऊ IPL वेळी मुंबई इंडियन या संघात खेळले होते. याचबरोबर किंग्ज एलेवन पंजाब या संघामध्ये हे खेळले होते. जर हे दोघे बंधू फॉर्म मध्ये राहिले तर लवकरच आपल्याला भारतीय संघात खेळताना दिसतील.
जतिन सक्सेना आणि जलद सक्सेना:-
हे सक्सेना बंधू केरळ राज्यात राहणारे आहेत. रणजी ट्रॉफी मध्ये या दोन्ही भावांनी जबरदस्त खेळी केली होती. तसेच आक्रमक फलंदाज जलद सक्सेना करत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच आपल्याला ही जोड भारतीय संघात दिसून येईल.
राघव धवन आणि ऋषी धवन:-
ऋषी धवन हिमाचल प्रदेश संघाचे नेतृत्व करत आहेत. तसेच ऋषी धवन ला आतंरराष्ट्रीय क्रिकेट संघात प्रदर्पण करण्यास संधी सुद्धा मिळाली होती. तसेच ऋषी धवन हे आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जातात. परंतु राघव धवन चां पाहिजे तसा फॉर्म नाही परंतु येणाऱ्या दिवसात हे दोन्ही भाऊ आपल्याला भारतीय संघात खेळताना दिसतील.