मुंबई इंडियन्सला मोठा धक्का… तब्बल 17.50 कोटी जाणार पाण्यात? करोडोंची बोली लावलेला हा खेळाडू नाही खेळाडू शकणार आयपीएल 2023!
आयपीएल 2023 हंगाम सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने शुक्रवारी (23 डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव आयोजित केला होता. लिलावात भारतीय आणि विदेशातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. कोचीमध्ये पार पडलेल्या या लिलावात खेळाडूंवर कोट्यावधी रुपये खर्च केले गेले.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने त्याला 17.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. मात्र, आता ऑस्ट्रेलियातून मुंबई संघासाठी एक काळजी करणारी बातमी येत आहे.
सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळला जातोय. या सामन्याच्या पहिल्या दिवशी पाच बळी घेऊन दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळण्यात कॅमेरून ग्रीन याने सिंहाचा वाटा उचललेला.
दुसऱ्या दिवशीही डेव्हिड वॉर्नरच्या शतकाने ऑस्ट्रेलियाने सामन्यावरील आपली पकड मजबूत केली. मात्र, त्याचवेळी कॅमेरून ग्रीन हा गंभीररित्या जखमी झाला.
.@mipaltan win the bidding war to welcome Australian all-rounder Cameron Green!💰✅
He is SOLD for INR 17.5 Crore 👏 👏#TATAIPLAuction | @TataCompanies pic.twitter.com/tJWCkRgF3O
— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022
वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किए याचा एक वेगवान चेंडू त्याच्या उजव्या हाताच्या बोटावर लागल्याने त्याचा हात पूर्णपणे रक्ताने माखलेला दिसला. त्यामुळे तो रिटायर्ड हर्ट होत मैदानातून बाहेर झाला. तसेच तो या सामन्यात सहभागी होण्याची शक्यताही कमी आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ग्रीन याची दुखापत काहीशी गंभीर आहे. त्यामुळे तो चार ते पाच महिन्यांसाठी मैदानापासून बाहेर राहू शकतो.

ग्रीन पाच महिन्यांसाठी क्रिकेटपासून दूर राहिल्यास मुंबई इंडियन्सचे मोठे नुकसान होऊ शकते. आयपीएलमध्ये त्याच्यावर मुंबईने 17.50 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तो आयपीएलमध्ये सहभागी न झाल्यास मुंबईला त्याला अर्धी रक्कम देणे बंधनकारक राहील.