मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भारताने श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. विश्वचषक 2023 मध्ये भारताचा हा सलग सातवा विजय आहे. या विजयासह भारतीय संघाने थेट सेमी फायनल मध्ये धडाकेबाज एन्ट्री केली. सेमी फायनल मध्ये पोहोचवणारा भारत पहिला संघ ठरला आहे.
भारताने सामना जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा असे काही केले, ज्यामुळे चाहत्यांच्या मनात त्याच्याबद्दलचा आदर वाढला. सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने आपल्या युवा क्रिकेट चाहत्याला एक बूट भेट दिला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झेलणाऱ्या रोहित शर्माला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात छाप सोडता आली नाहीत. तो चार धावांवर बाद झाला. मात्र रोहितच्या संघाने श्रीलंकेच्या संघाला चारी मुंड्याचीच करत विजय मिळवला.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताचा विश्वचषक स्पर्धेतला हा सर्वात मोठा विजय देखील ठरला.
भारताने एकतर्फी विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने मात्र चाहत्यांची मने जिंकली. सामना संपल्यानंतर रोहित ड्रेसिंग रूम कडे जाताना क्रिकेट फॅन्स जोर-जोरात ओरडत होते. त्यानंतर रोहितने त्याच्या पायातील बूट काढून तो भेट दिला.
भारताने या सामन्यात श्रीलंकेवर एकतर्फी विजय मिळवला. डोंगराएवढा दिलेल्या आव्हानांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 19.4 षटकात 55 धावांवर सर्व बाद झाला. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला हा भारताचा सर्वात मोठा विजय आहे तर एक दिवसीय क्रिकेट मधला भारताचा हा सर्वात दुसरा मोठा विजय ठरला.
या विजयावरून भारताने दाखवून दिले की त्यांना विजयाचा प्रबळ दावेदार का मानला जात आहे. या विजयासह भारताने दक्षिण आफ्रिकेला पाठीमागे टाकत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कब्जा केला. भारताचा पुढचा सामना 5 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिके विरुद्ध कोलकाताच्या मैदानावर होणार आहे.
Roht Sharma ❤️pic.twitter.com/jT3NC1HOk8
— CricTracker (@Cricketracker) November 2, 2023
2011 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता तेव्हा रोहित शर्मा याला खराब संघात स्थान देण्यात आले नव्हते. आज रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. यंदाच्या वर्षात भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यास रोहित शर्मा हा विश्वचषक जिंकून देणारा कपिल देव, महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर तिसरा कर्णधार ठरेल. रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करत असताना संघाला पाच वेळा आयपीएलचा किताब मिळवून दिला. अशाच कामगिरीची अपेक्षा याही वर्षी त्याच्याकडून भारतीय क्रिकेट प्रेमी करत आहेत. भारतीय क्रिकेट संघातील इतर खेळाडू देखील रोहित शर्माला आपल्या कामगिरी द्वारे चांगली मदत करत आहे.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी