कर्णधार म्हणून खेळतांना ‘या’ 5 खेळाडूंनी काढल्यात सर्वांत जलद 1000 धावा, यादीत केवळ 2 भारतीय खेळाडूंचा समावेश..

0
3

अंतरराष्टीय क्रिकेटमध्ये दररोज अनेक विक्रम होतात आणि मोडतात. आजच्या या विशेष लेखामध्ये आम्ही तुम्हाला अश्याच एका विक्रमाबद्दल सांगणार आहोत. हा विक्रम म्हणजे कर्णधार म्हणून खेळतांना खेळाडूंनी सर्वांत जलद 1000 धावा पूर्ण करने. कर्णधार म्हणून खेळतांना सर्वांत जलद 1000 धावा पूर्ण करणाऱ्या 5  फलंदाजाविषयी आज आपण या विशेष लेखामध्ये माहिती घेणार आहोत.

कर्णधार म्हणून खेळतांना या 5 खेळाडूंनी काढल्यात सर्वांत जलद 1000 धावा.

  • विराट कोहली (Virat Kohli)

T20 मध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणाराविराट कोहली (Virat Kohli) पहिला कर्णधार आहे.  कोहलीने जगातील सर्वोत्तम फलंदाजांना मागे टाकत या यादीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. किंग कोहलीने अवघ्या 30 डावात ही कामगिरी केली आहे. आता बाकी खेळाडूंवर एक नजर टाकू ज्यांनी T20 मध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.

T-20 World Cup 2024: विराट कोहली नाही खेळणार टी-२० विश्वचषक, समोर आले धक्कादायक कारण..

कर्णधार म्हणून 1000 धावा पूर्ण करणारा कोहली हा जगातील सहावा आणि भारतातील दुसरा फलंदाज आहे. कोहलीपूर्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ही कामगिरी केली होती. कर्णधार म्हणून धोनीने 72 सामन्यात 37.06 च्या सरासरीने 1112 धावा केल्या आहेत, तर कोहलीने 32 सामन्यात 1006 धावा केल्या आहेत.

  • फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis)

दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार आणि अनुभवी उजव्या हाताचा फलंदाज फाफ डू प्लेसिसने टी20 मध्ये कर्णधार म्हणून 31 डावात 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. मात्र,  कोहलीने त्याच हा विक्रम मोडला आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या डू प्लेसिसने 44 सामन्यांत 35.87 च्या सरासरीने 1363 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. या कालावधीत त्याची सर्वोच्च धावसंख्या ११९ धावांची आहे.
  • केन विल्यमसन (Kane Williamson)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kane Williamson (@kane_s_w)

या यादीत किवी संघाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज केन विल्यमसनचे नाव तिसऱ्या स्थानावर आहे. कर्णधार म्हणून 1000 धावा पूर्ण करण्यासाठी त्याने 36 डाव खेळले आहेत. तसेच, विल्यमसन सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 1083 धावा केल्या आहेत.

इयॉन मॉर्गन (Eoin morgan)

इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार आणि डावखुरा स्फोटक फलंदाज इयॉन मॉर्गनने (eoin morgan) कर्णधार म्हणून T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 42 डावात 1000 धावा पूर्ण केल्या. कर्णधार म्हणून त्याने आतापर्यंत 1013 धावा केल्या आहेत आणि या बाबतीत तो जगातील चौथा कर्णधार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Eoin Morgan (@eoinmorgan16)

  • विल्यम पोर्टरफिल्ड (William Porterfield)

आयर्लंडचा माजी कर्णधार आणि सलामीवीर विल्यम पोर्टरफिल्डने 54 डावात 1002 धावा केल्या आहेत. T20 मध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पाचव्या स्थानावर आहे.

महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni)

कर्णधार म्हणून खेळतांना 'या' 5 खेळाडूंनी काढल्यात सर्वांत जलद 1000 धावा, यादीत केवळ 2 भारतीय खेळाडूंचा समावेश..

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे नाव टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद 1000 धावा करणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट आहे. त्याने हा विक्रम 57 डावात केला. कर्णधार म्हणून धोनीने 72 सामन्यांत 37.06 च्या सरासरीने 1112 धावा केल्या आहेत. (captain who smashed fastest 1000 runs)


हेही वाचा:

“माही सुट्टा मार रहा है..” महेंद्रसिंग धोनी हुक्का पितांनाचा व्हिडीओ तुफान व्हायरल, चाहत्यांना संताप अनावर, पहा व्हायरल व्हिडीओ..

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here