IND vs SL LIVE: चालू सामन्यात पुन्हा जखमी झाला श्रीलंकेचा हा खेळाडू, ओठांतून येत होते रक्त तरीही करत होता क्षेत्ररक्षण, व्हिडीओ होतोय व्हायरल..
भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पाहुण्या संघासाठी या सामन्याची सुरुवात काही खास नव्हती. त्याचवेळी या सामन्यात संघाची स्टार गोलंदाज चमिका करुणारत्नेला पुन्हा एकदा आपल्या जुन्या दुखण्याला सामोरे जावे लागले. 10 जानेवारी रोजी खेळल्या जात असलेल्या या सामन्यात गोलंदाजी करत असताना चमिकाच्या तोंडाचे टाके उघडले आणि त्यानंतर रक्तस्त्राव झाला. यासंबंधीचा एक व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
थेट सामन्यात चमिका करुणारत्ने पुन्हा एकदा रक्तबंबाळ झाला.

काय झाले होते 7 डिसेंबला?
वास्तविक, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खेळल्या गेलेल्या लंका प्रीमियर लीग 2022 दरम्यान, चमिका करुणारत्नेसोबत मोठा अपघात झाला होता. 7 डिसेंबर रोजी गॅले ग्लॅडिएटर्स आणि कॅंडी फाल्कन्स यांच्यातील सामन्यात क्षेत्ररक्षण करताना चमिका चेहऱ्यावर पडला होता. यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली होती. त्याचे 4 दात सुद्धा तुटले होते.
इतकंच नाही तर त्यादरम्यान त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं आणि चमिकाला 30 टाके पडले. या घटनेनंतर तीनच दिवसांनी तो मैदानावर उतरला होता. त्यानंतर आता एक महिन्यानंतर 10 जानेवारी रोजी भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी करताना त्याच्या तोंडातील टाके उघडले गेले.
भारतीय संघाच्या डावातील 16 वे षटक टाकण्यासाठी चमिका आला होता. या षटकातील पाचवा चेंडू टाकल्यानंतर कॅमेरा चमिकाच्या दिशेने गेला तेव्हा त्याच्या तोंडातून रक्त येत असल्याचे दिसले. मात्र, त्यानंतरही तो खेळत राहिला आणि सामना थांबवला नाही.त्यानंतर मात्र संघाच्या कोचने त्याची पाहणी करण्यासाठी त्याला डगआउटमध्ये बोलावून घेतले.
दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, श्रीलंकेच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात उत्कृष्ट झाली आणि संघाच्या सलामीवीरांमध्ये 140 हून अधिक धावांची भागीदारी झाली.
चमिका करुणारत्नेच्या दुखापतीचा व्हिडिओ
Lips blood pic.twitter.com/dpPwSbTp71
— Saddam Ali (@SaddamAli7786) January 10, 2023
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या: