Champion Trophy 2025: ICC विश्वचषक 2023 सध्या अंतिम टप्प्यात आहे. आज भारत विरुद्ध नेदरलँड्स (IND vs NED) यांच्यातील साखळी सामन्यानंतर उपांत्य फेरी आणि त्यानंतर थेट अंतिम सामना रंगणार आहे. अशा स्थितीत विश्वचषक अत्यंत रोमांचक अवस्थेत पोहोचला आहे. साखळी सामने संपल्यानंतर 2025 मध्ये होणाऱ्या आयसीसी स्पर्धेतील चॅम्पियन्स ट्रॉफीचे चित्रही स्पष्ट झाले आहे.
आयसीसीने विश्वचषकाच्या अगदी सुरुवातीलाच नियम बनवला होता की, जागतिक गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर असलेला संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरू शकतो. तर आता कोणते 8 संघ पात्र ठरले आहेत आणि कोणते दोन संघ बाहेर आहेत ते आपण या फिचरमध्ये जाणून घेणार आहोत.

Champion Trophy 2025: हे 8 संघ ठरले पात्र.
या विश्वचषकात विश्वविजेता संघ इंग्लंडची अवस्था खूपच वाईट होती, क्षणभर असे वाटले होते की, इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रही ठरणार नाही. मात्र अखेरचा साखळी सामना जिंकून इंग्लंडने आपली पात्रता निश्चित केली आहे. याशिवाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तानही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेल्या चार संघही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरले आहेत. दुसरीकडे, श्रीलंकेला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळवता आलेली नाही.
IND VS NED: आज भारत जिंकला तर बांग्लादेशला होईल फायदा..
बांगलादेश आणि नेदरलँड्स यांच्यात आयसीसी स्पर्धेसाठी कोण पात्र ठरणार हे प्रकरण अजूनही स्पष्ट झाले नाहीये. नेदरलँड्सने आज भारताला हरवले तर ते बांगलादेशच्या वर जाऊन चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरतील. मात्र, नेदरलँड्ससाठी भारतीय संघाला पराभूत करणे खूप कठीण आहे, त्यामुळे नेदरलँड आणि श्रीलंका चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडणे जवळपास निश्चित झाले आहे. आज नेदरलँड भारताकडून हरले तर बांगलादेशही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरेल.
Champion Trophy 2025 साठी पात्र ठरलेले संघ:
भारत, दक्षिण आफ्रिका,ऑस्ट्रोलीया, न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान,इंग्लंड, अफगाणिस्तान.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..