Champion Trophy 2025 timetable झाला जाहीर..! या दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान, टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जायला तयार?

0

Champion Trophy 2025 timetable:  टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2024 चे जेतेपद पटकावले आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचे पुढील लक्ष्य आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकण्याचे आहे. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड करत आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघही भिडणार आहेत.

Champion Trophy 2025 चे वेळापत्रक समोर, या दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान, टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जायला तयार?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर चॅम्पियन्स ट्रॉफी-2025 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, याला अद्याप आयसीसीची मान्यता मिळालेली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती दिली आहे की, 19 फेब्रुवारी ते 9 मार्च ही तारीख ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आयोजनासाठी ICC ला देण्यात आली आहे.

 

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान त्रिकोणी मालिका खेळणार आहे

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2024-25 या वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पीसीबीने हे वेळापत्रक आपल्या अधिकृत X खात्यावर देखील शेअर केले आहे. पीसीबीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पाकिस्तान क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसोबत त्रिकोणी वनडे मालिकाही खेळणार आहे.

8 ते 14 फेब्रुवारी दरम्यान ही त्रिकोणी मालिका खेळवली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डही या त्रिकोणी मालिकेचे आयोजन करणार आहे. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करणार आहे.

 

चॅम्पियन्स ट्रॉफी आयसीसी आयोजित केली जाते. त्यामुळे आयसीसीही या स्पर्धेच्या आयोजनाबाबत अधिकृत घोषणा करणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी-2025 चे आयोजन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड करणार आहे. त्यामुळे त्यांनी हे वेळापत्रक आयसीसीकडे सोपवले आहे. ICC लवकरच त्याची अधिकृत घोषणा देखील करू शकते.

 

Champion Trophy 2025 मध्ये  कोणते संघ सहभागी होतील?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड, बांगलादेश, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे संघ सहभागी होणार आहेत.

बांगलादेश, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजही पाकिस्तानचा दौरा करणार आहेत

चॅम्पियन्स ट्रॉफी-2025 पूर्वी बांगलादेश, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे संघही पाकिस्तानचा दौरा करणार आहेत. बांगलादेश संघ 21 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2024 या कालावधीत पाकिस्तानमध्ये 2 कसोटी सामने खेळणार आहे. यानंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तानचा दौरा करेल आणि तेथे ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळेल.

Champion Trophy 2025 timetable झाला जाहीर..! या दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान, टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जायला तयार?

ही मालिका 7 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 2024 दरम्यान खेळवली जाईल. यानंतर, 16 जानेवारी ते 28 जानेवारी 2025 पर्यंत, वेस्ट इंडिजचा संघ पाकिस्तानचा दौरा करेल आणि 2 कसोटी सामने खेळेल. त्यानंतर पाकिस्तान न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसोबत त्रिकोणी मालिका खेळणार आहे. ही मालिका 8 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान पाकिस्तानमधील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाईल.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर

सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत या नवीन खेळाडूचा समावेश, रोहित शर्मा आणि विराट कोहली नंतर येतो त्याचा नंबर.

Leave A Reply

Your email address will not be published.