Champion Trophy 2025 Venue: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे ठिकाण निच्छित, या ठिकाणी होणार संपूर्ण स्पर्धा,

 Champion Trophy 2025 Venue: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे ठिकाण निच्छित, या ठिकाणी होणार संपूर्ण स्पर्धा,

 Champion Trophy 2025 Venue: ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. 2025 मध्ये होणाऱ्या आयसीसी स्पर्धेसाठी करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी 8 संघ पात्र ठरले आहेत. आयसीसी विश्वचषक 2023 क्रमवारीत अव्वल 8 संघांना चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची संधी मिळेल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या देशात होणार आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या देशात होणार आहे? ( Champion Trophy 2025 Venue)

 Champion Trophy 2025 Venue: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे ठिकाण निच्छित, या ठिकाणी होणार संपूर्ण स्पर्धा,
 Champion Trophy 2025 Venue:

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानात आयोजित करण्याचे आधीच ठरले होते, परंतु भारताने हा सामना पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेतही भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये सामना खेळण्यास नकार दिला होता, त्यानंतर आशिया चषकातील भारताचा सामना श्रीलंकेत झाला होता. नंतर, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तानला यजमान संघ बनवण्याची चर्चा झाली, तेव्हा भारतीय संघाने पुन्हा पाकिस्तानमध्ये स्पर्धा खेळण्यास नकार दिला. पीसीबीने बीसीसीआयकडे आक्षेप व्यक्त केला आणि आयसीसीकडे तक्रारही केली. आता आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानातच होणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

 Champion Trophy 2025 Venue: भारताचे सामने कुठे होणार?

आयसीसी प्रयन्तात आहे की, पाकिस्तान जसा विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात आला होता. तसाच भारतीय संघ सुद्धा  या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये खेळण्यास यावा. मात्र बीसीसीआयने संघाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अद्याप यावर होकार दिलेला नाहीये. शिवाय जर भारतीय संघ शेवटपर्यंत पाकिस्तानमध्ये गेलाच नाही तर भारताचे सामने श्रीलंका किंवा वेस्ट इंडीजमध्ये आयोजित केले जाऊ शकतात.

 Champion Trophy 2025 : हे संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.  Champion Trophy 2025 Qualified Teams)

 Champion Trophy 2025 Venue: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे ठिकाण निच्छित, या ठिकाणी होणार संपूर्ण स्पर्धा,

आयसीसी विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) गुणतालिकेत जे संघ अव्वल 8 मध्ये होते तेच संघ 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरले आहेत. इंग्लंडसारखा मोठा संघही या स्पर्धेतून बाहेर पडू शकला असता, पण  शेवटी विश्वचषकातील शेवटच्या साखळी सामन्यात  इंग्लंडने विजय मिळवून पात्रता मिळवली. याशिवाय वेस्ट इंडिज आणि श्रीलंका हे आणखी दोन मुख्य संघ आहेत जे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार नाहीत. या मोठ्या आयसीसी स्पर्धेसाठी पात्र ठरलेले संघ भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेश आहेत.


हेही वाचा:

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *