Champions Trophy 2025 : रोहित शर्मा नाही तर ‘हा’ खेळाडू करणार भारतीय संघाचे नेतृत्व, या 15 खेळाडूंना मिळणार पाकिस्तानमध्ये जाण्याची संधी..

0

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीची पुढील आवृत्ती फेब्रुवारी 2025 मध्ये आयोजित केली जाईल, ज्याचे आयोजन पाकिस्तान करेल. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत पराभव झाल्यानंतर, वनडे फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या पुढील स्पर्धेत भारताचे नेतृत्व कोण करणार याची चर्चा खूप तीव्र झाली आहे.

यावर काही लोकांचा असा अंदाज आहे की,केएल राहुल भारतीय संघाची कमान सांभाळू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाचा संभाव्य संघ कोणता असू शकतो ते पाहूया.

World Cup Final: टीम इंडिया अंतिम सामन्यात पोहचताच पाकिस्तानच्या पोटात दुखायला लागले, व्हिडीओ पोस्ट करत रोहित शर्मावर केले गंभीर आरोप..

Champions Trophy 2025 : हे संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळतील.

ICC ची पुढील स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025), एकदिवसीय स्वरूपात खेळली जाणार आहे, 2023 च्या विश्वचषकातील शीर्ष 7 संघ आणि यजमान देश पाकिस्तान यांच्यात खेळली जाईल. दरम्यान, 2025 मध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन ट्रॉफी खेळवली जाईल. विश्वचषक २०२३ चे इतर दोन संघ, श्रीलंका आणि नेदरलँड्स या स्पर्धेतून बाहेर पडले होते आणि विश्वचषकासाठी पात्र ठरू शकले नाहीत, ते चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याच्या शर्यतीतून आधीच बाहेर होते.

14 महिन्यांनंतर पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाचा संघ कसा असेल? त्याची चर्चा भारतीय चाहत्यांमध्ये जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत काही लोकांचा असा विश्वास आहे की 14 महिन्यांनंतर होणाऱ्या या स्पर्धेत फक्त केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

Champions Trophy 2025 : रोहित शर्मा नाही तर 'हा' खेळाडू करणार भारतीय संघाचे नेतृत्व, या 15 खेळाडूंना मिळणार पाकिस्तानमध्ये जाण्याची संधी..

चाहत्यांचा असा विश्वास आहे की ,केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2024 मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणारा टी-20 विश्वचषक जिंकला, तर अशा परिस्थितीत संघ 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही सामील होऊ शकतो.  2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा संभाव्य संघ कोणता असू शकतो त्यावर एक नजर टाकूया .

Champions Trophy 2025 साठी  टीम इंडियाचा संभाव्य संघ

रोहित शर्मा (फिट असल्यास)  शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, इशान किशन, केएल राहुल (कर्णधार),, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave A Reply

Your email address will not be published.