आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात परंतु सर्व खेळात जास्त वर्चस्व हे क्रिकेट खेळाचे आहे हे आपल्याला माहीतच आहे. आपल्या देशात लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट प्रत्येकालाच आवडते. तसेच युवा पिढी क्रिकेट कडे जास्त आकर्षित होताना आपल्याला दिसत आहे.
भारतीय क्रिकेट संघ हा जगातील सर्व संघापैकी उत्तम संघ म्हणून ओळखला जातो. कारण आपल्या देशात अनेक आक्रमक फलंदाज आणि गोलंदाज होऊन गेले आहेत. काही भारतीय क्रिकेटर ची रेकॉर्ड कोणीच तोडू शकत नाही असे सुद्धा खेळाडू आपल्या देशात आहेत.

भारताची लोकसंख्या ही जगात दुसऱ्या स्थानी येते आणि एवढ्या लोकसंख्येमधून अवघे 15 खेळाडू देशासाठी खेळवले जातात मग विचार करा हे खेळाडू हे उत्तमच असणार.
तर मित्रांनो आज आम्ही लेखात अश्या एका खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्याने भारतीय संघामध्ये 10 हजारपेक्षा जास्त धावा आणि 791 विकेट घेऊन आता छोटेसे दुकान टाकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.
क्रिकेट मध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक खेळाडूला फॉर्म हा खूप गरजेचं असतो. कारण जर का खेळाडूंचा फॉर्म हा चांगला नसेल तर त्या खेळाडूला नंतरचे सामने खेळण्यासाठी आणि निवडीसाठी अनेक समस्या येतात किंवा त्याचे संपूर्ण करियर सुद्धा धोक्यात येत असते म्हणून फॉर्म हा गरजेचा असतो.
श्रीलंकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटर उपुल चंदना. ९० च्या दशकात तो आपल्या संघातील सामना जिंकणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीमध्ये त्याने अनेक प्रसंगी आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
उपुल चंदना हा श्रीलंका देशाचा ऑल राऊंडर खेळाडू होता. शिवाय श्रीलंका संघात या खेळाडूला महत्वाचे स्थान होते.
श्रीलंकेतील गाले येथे जन्मलेल्या उपुल चंदना चे नाव हे मोठ्या आदराने घेतले जाते. चंदना 50 वर्षांची असून ती श्रीलंकेतील विजेरामा येथे स्पोर्ट्स शॉप चालवते.
क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर चंदना ने हे दुकान उघडले. बऱ्यापैकी बहुतेक क्रिकेटपटू निवृत्तीनंतर तज्ञ, समालोचक किंवा प्रशिक्षक बनतात किंवा काही निवांत राहतात. परंतु चंदना शांत न बसता त्यानं स्पोर्ट्स शॉप चालवायचं ठरवलं.
चंदना यांनी २००७ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कायमचा निरोप दिला आणि क्रिकेट मधून निवृत्त झाले . त्याने 13 वर्षे श्रीलंकन क्रिकेट मध्ये मोलाचे योगदान दिले. निवृत्ती नंतर 1 वर्षातच म्हणजे 2009 साली उपुल चंदना यांनी त्यांचे स्पोर्ट्स शॉप उघडले.