- Advertisement -

गुजरात टायटन्स संघाने सोशल मीडियावर केली ही पोस्ट, मॅच दरम्यान या 13 गोष्टी स्टेडियम मध्ये नेण्यास सक्त मनाई, जाणून घ्या सविस्तर.

0 9

 

 

 

 

 

यंदा चा 2023 चा आयपीएल हंगाम हा 31 मार्च पासून सुरू होणार आहे. या आयपीएल मध्ये अनेक बदल केलेले आहेत. तसेच अनेक खेळाडू नवीन सुद्धा आले आहेत. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या दिग्गज खेळाडू बद्दल सांगणार जे दोन्ही संघात खेळणार आहे शिवाय पहिल्याच सामन्याच्या आधी काही गोष्टींवर बंदी सुद्धा घातली आहे जाणून घेऊया कोणत्या कोणत्या वस्तू स्टेडियम मध्ये नेण्यास सक्त मनाई केली आहे.

 

 

यंदा च्या IPL 2023 च्या सुरुवातीच्या सामन्यापूर्वी, गुजरात टायटन्स या संघाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, त्या पोस्ट मध्ये असे नमूद केले आहे की नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल चा पहिला सामना खेळण्यात येणार आहे या सामन्यादरम्यान तसेच स्टेडियम मध्ये पॉवर बँक, सिगारेट लाइटर, लाकडी दांडके, धारदार वस्तू, बॅकपॅक, सेल्फी स्टिक, बाटल्या, छत्री, कॅमेरा, शस्त्रे, अन्न, हेल्मेट आणि नाणी यांसारख्या वस्तूं वर निर्बंध घातले आहेत शिवाय या वस्तू स्टेडियम मध्ये नेण्यास सक्त मनाई केली आहे.

 

 

2023 मध्ये आयपीएल ची लढत ही चेन्नई सुपर किंग आणि गुजरात टायटन्स या दोन संघामध्ये होणार आहे. दोन्ही संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत तरी कोण या सामन्यात कोणाचा विजय होईल हे सांगता येत नाही.

 

चेन्नई सुपर किंग:-

चेन्नई सुपर किंग संघात एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथिशा पाथीराना, सिमरजीत सिंग, दीपक चहर, प्रशांत सोलंकी, महेश थिकशन, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधू, काइल जेमिसन, अजय मंडल, भगत वर्मा या खेळाडूंचा समावेश असणार आहे.

 

गुजरात टायटन्स:-

गुजरात टायटन्स संघात हार्दिक पंड्या (कर्णधार), राशिद खान, राहुल तेवतिया, शुबमन गिल, मोहम्मद शमी, शिवम मावी, जोशुआ लिटल, यश दयाल, डेव्हिड मिलर, आर साई किशोर, अभिनव सदरांगानी, अल्झारी जोसेफ, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, वृद्धिमान साहा, जयंत यादव, विजय शंकर, केएस भरत, ओडियन स्मिथ, मोहित शर्मा, नूर अहमद, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, दर्शन नळकांडे, साई सुदर्शन या खेळाडूंचा समावेश असणार आहे.

 

 

आयपीएल सामन्याची पहिली लढत ही 31 मार्च रोजी गुजरात येथे नरेंद्र मोदी स्टेडियम येथे होणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग जिंकेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.