चेतन शर्माने अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे ‘या’ 4 खेळाडूंनी कारकीर्द होऊ शकते उध्वस्त, एकजनाविषयीतर स्वतः चेतन शर्माने केलाय धक्कादायक खुलासा..
चेतन शर्माने अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे ‘या’ 4 खेळाडूंनी कारकीर्द होऊ शकते उध्वस्त, एकजनाविषयीतर स्वतः चेतन शर्माने केलाय धक्कादायक खुलासा..
भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी नुकत्याच झालेल्या स्टिंग ऑपरेशननंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. ज्याला बीसीसीआयने मान्यता दिली आहे. पण, राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी असे काही खुलासे केले आहेत. ज्याबद्दल क्वचितच कोणाला माहिती असेल.
व्हायरल व्हिडिओमध्ये त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंचा पर्दाफाश केला. खासकरून भारतीय संघाचा टी-२० कर्णधार आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याबद्दल अशी गोष्ट सांगितली आहे जी कळताच क्रिकेट चाहत्यांनी हार्दिकवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केलीय .
मात्र, यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या मैत्रीचे वर्णन जय-वीरू असे करण्यात आले. त्याचवेळी, सोशल मीडियावर दोन दिग्गज खेळाडूंमधील लढतीची अटकळही त्यांनी फेटाळून लावली. अशा परिस्थितीत आम्ही या लेखाद्वारे त्या 5 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्या कारकिर्दीवर ‘चेतन शर्मा’च्या राजीनाम्यानंतर चांगलाच परिणाम होणार आहे. चेतनने त्यांना अनेक वेळा संधी दिल्या मात्र नवीन निवड समिती अध्यक्ष कदाचित त्यांच्या य चुकांकडेदुर्लक्ष करणार नाही, आणि त्यांची कारकीर्द लवकर समाप्त होऊ शकते. चला तर जाणून घेऊया नक्की कोणते आहेत ते खेळाडू…
रोहित शर्मा: भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. या ३५ वर्षीय खेळाडूचे करिअर लवकरच उद्ध्वस्त होणार आहे. चेतन शर्माच्या स्टिंग ऑपरेशननंतर हिटमॅन सोशल मीडियावर वादात सापडला आहे. माजी निवडकर्त्याच्या स्टिंगनंतर त्याची कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. या मागे दोन कारणे आहेत एक म्हणजे स्वतः रोहित शर्माच फॉर्म आणि दुसरे म्हणजे चेतन शर्मा नेहमीच रोहितला संधी देत आला होता मात्र नवीन निवड समिती अध्यक्ष जोपर्यंत रोहित फिटनेस टेस्ट आणि फॉर्म दोन्ही गोष्टीमध्ये फिट बसत नाही तोपर्यंत त्याला संघातून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात. अश्या स्थितीत रोहितला संघात आपली जागा टिकवून ठेवणे अवघड जाईल ,यात मात्र शंका नाही.

मागे एका मुलाखतीमध्ये रोहित शर्मासोबत तो फोनवर तासनतास बोललो, असे चेतन शर्माने सांगितले होते. त्या दोघांची मैत्री सर्व लोकांना माहिती होती. त्यामुळेच रोहितला तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनवण्यात आले. पण, टी-20 विश्वचषकातील दारुण पराभवानंतर त्याच्याकडून टी-20 कर्णधारपद काढून घेण्यात आले. पण, आता चेतनने राजीनामा दिल्याने रोहित शर्माची कारकीर्दही त्याच्या राजीनाम्याने संपणार ,असच दिसतंय. याचा याचा पुरावा म्हणजे ‘रोहितला टी-२० मालिकेपासून दूर ठेवणे.’
हार्दिक पंड्या: दुखापतीमुळे हार्दिक पंड्याने प्रदीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन केले. मात्र, दुखापतीतून सावरल्यानंतरही तो मधल्या काळात दुखापतीमुळे मैदानात चांगली कामगिरी करतांना दिसला नाही. हार्दिक पंड्या गोलंदाजांना स्वतःला पुढे ठेवण्याचे कारण म्हणून ठेवतो. याचा अर्थ हार्दिक अजून पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. याचा नमुना नुकत्याच खेळल्या गेलेल्या श्रीलंकेच्या टी-20 मालिकेत पाहायला मिळाला.
View this post on Instagram
जिथे त्याने डावातील शेवटचे षटक स्वतः टाकले नाही आणि चेंडू अक्षरकडे सोपवला. तेव्हापासून चाहत्यांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचवेळी चेतन शर्माने असेही म्हटले होते की, हार्दिक फिट झाल्यानंतरही त्याने संघात खेळले पाहिजे. दुखापतीतून परतल्यावर हार्दिकने गोलंदाजीकडे अजिबात लक्ष दिले नाही. दुसरीकडे चेतन म्हणाला होता की, हार्दिक त्याच्या घरी यायचा आणि त्याला तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनवण्याविषयी बोलत असे. अशा परिस्थितीत चेतनला आता पदावरून हटवण्यात आले आहे, त्यामुळे त्याची कारकीर्दही उद्ध्वस्त होणार आहे.
दीपक हुड्डा : दीपक हुड्डा ने सुपर जायंट्सकडून खेळताना शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याने भारतीय संघाच्या T20 संघात स्थान मिळवले. 2022 च्या आशिया चषक आणि T20 विश्वचषकाचाही तो भाग होता. पण, हुडाला काही चांगला खेळ दाखवता आला नाही. आयर्लंडविरुद्धची शतकी खेळी वगळता त्याला कोणत्याही सामन्यात विशेष कामगिरी करता आलेली नाही.
खराब कामगिरीनंतरही चेतन शर्मा त्याला सतत संघात सामील करून घेत असे. त्याचवेळी हुड्डाही त्यांच्या घरी यायचा आणि संघात ठेवण्याची मागणी करत असे, असेही त्यांनी सांगितले. अशा स्थितीत त्यांच्या जाण्यानंतर हुड्डाची कारकीर्द उद्ध्वस्त होऊ शकते. त्याने 21 सामन्यांच्या 17 डावात 147.2 च्या स्ट्राईक रेटने 368 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून फक्त एकच शतक झळकले आहे.
जसप्रीत बुमराह : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे जवळपास वर्षभरापासून बाहेर आहे. गेल्या वर्षभरात बुमराहला भारताकडून फक्त एकच टी-२० सामना खेळता आला. ज्यामध्ये तो जखमी झाला आणि त्याला वर्ल्ड कपमधूनही बाहेर राहावे लागले. हा खेळाडू सध्या टीम इंडियासाठी चर्चेचा विषय बनला आहे. बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे बीसीसीआयचे निवडक चेतन शर्मा यांना माहीत होते.
यानंतरही त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरवण्यात आले. त्याचवेळी या खेळाडूने स्वतः सांगितले आहे की, आता तो पूर्वीसारखी जीवघेणी गोलंदाजी करू शकणार नाही. ज्यासाठी तो ओळखला जातो. भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक श्रीधर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याचा खुलासा केला आहे. ज्यामध्ये बुमराहने स्वतः त्याला हे सर्व सांगितले आहे. यानंतर बुमराह पुन्हा कधीही टीम इंडियासाठी खेळू शकणार नाही, असे वाटत होते.
हेही वाचा:
व्हिडीओ प्लेलीस्ट:
https://youtu.be/treU6AddvMI