चेतेश्वर पुजाराची गोलंदाजी पाहून टीम इंडियाचे खेळाडू सुद्धा लागले हसायला, स्वतः कर्णधार रोहित शर्माही झाला खुश तर स्मितची प्रतिक्रिया होतेय तुफान व्हायरल..
तुम्ही टीम इंडियाचा टेस्ट एक्सपर्ट चेतेश्वर पुजाराला बॅटिंग करून गोलंदाजांना घाम फोडताना पाहिलं असेल, पण तो बॉलिंग करताना फार कमी प्रसंगी दिसला आहे. पुजाराची गोलंदाजी पाहणे हा एक खास प्रसंग आहे. चौथ्या कसोटी सामन्यात तो गोलंदाजी करताना दिसला. त्याने फक्त एक षटक टाकले, पण हे षटक चांगलेच चर्चेचे ठरले. त्याला गोलंदाजी करताना पाहून टीम इंडियाचा स्टार गोलंदाज कुलदीप यादवलाही आपले हसू आवरता आले नाहीये.

पुजाराने टाकले 78 वे षटक..
हे दृश्य भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षनावेळी 78 व्या षटकात दिसले. ऑस्ट्रेलियाच्या तुक-तुक फलंदाजीसमोर टीम इंडियाचे गोलंदाज थकले असताना कर्णधार रोहित शर्माने चेतेश्वर पुजाराला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. त्याने मार्नस लॅबुशेन आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्यापुढे पुजाराकडे गोलंदाजी सोपवली. पुजाराने पहिला चेंडू टाकला तेव्हा लबुशेनने धावत येऊन एकेरी धाव घेतली. यानंतर पुजाराने दुसरा चेंडू टाकला तेव्हा स्मिथने तो रोखला.
Pujara bowling for Sussex in County Championship.pic.twitter.com/srgosdxahm
— Johns. (@CricCrazyJohns) July 13, 2022
डगआऊटमध्ये बसलेला स्टार फिरकीपटू कुलदीप यादवही पुजाराची स्थिर गोलंदाजी पाहून हसला. त्याचवेळी ईशान किशन आणि जयदेव उनाडकट यांनी टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले. या षटकात पुजाराने एकही धाव दिली नाही. त्याने 1 षटकात 1 धाव देऊन किफायतशीर गोलंदाजी केल्याचे सिद्ध केले. यापूर्वी पुजारा काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्सकडून गोलंदाजी करताना दिसला होता.
पुजाराच्या गोलंदाजी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत कसोटीत 103 सामन्यात 18 चेंडू टाकले आहेत. तर 245 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 263 चेंडू टाकून 6 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 117 लिस्ट ए सामन्यांमध्ये एक षटक टाकले आहे.
टीम इंडिया WTC फायनलसाठी पात्र ठरली आहे
Cheteshwar Pujara bowled an over today in Test cricket after almost 7 years!
Rate his bowling pic.twitter.com/Y5jqN9Tpzw
— Fanatikk (@Fanatikkind) March 13, 2023
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे खेळली गेलेली चौथी कसोटी अनिर्णित राहिली. दुपारपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 175 धावा केल्या होत्या. यादरम्यान दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये चर्चा झाली आणि पंचांशी चर्चा केल्यानंतर सामना अनिर्णित राहिला. या ड्रॉसह, न्यूझीलंडने श्रीलंकेवर विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया WTC फायनलसाठी पात्र ठरली आहे, तर बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 ने जिंकली आहे. 7 जून रोजी डब्ल्यूटीसी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
हे ही वाचा..
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार
चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…
Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…